Press "Enter" to skip to content

पालकांना शाळा फि मध्ये सवलत मिळावी : मनसे विद्यार्थी सेनेची मागणी


सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । याकूब सय्यद । 🔷🔶🔷

नागोठणे येथील होली एंजल शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत असून त्या शाळेकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्यासाठी शाळेकडून वारंवार बोलले जात आहे. सध्या कोरोना महामारी संकटात आर्थिक मंदी तसेच बेरोजगारीने त्रस्त झालेले शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक हे शालेय फी भरण्यासाठी हतबल झाले आहेत. त्या परिस्थितीतून योग्य असा मार्ग निघावा तसेच शालेय फी सवलत मिळावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेतील फि सवलत मिळावं म्हणून लेखी अर्ज सह्या करून रोहा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष नवनाथ धुळे व सौ. दीपश्री घासे यांना अर्ज दिले.

त्या अर्जाची दखल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष यांनी घेऊन नागोठणे होली एजेल्स शाळेत जावून त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फी सवलत मिळावी असे निवेदन शाळेचे अधिकारी राजेंद्र विलेकर यांना दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.