Press "Enter" to skip to content

विकास कडू ने केली पर्यटक पक्षाची सुटका

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनील ठाकूर । 🔷🔶🔷

आताच्या कडक उन्हात पशु, पक्षी, मनुष्य होडपातून जातात तर अनेक पक्षी, प्राणी प्रेमी आपल्या घरा समोर पाणी पशु आहार ठेवतात. पण काही समाज कंटक आपली मज्या भागवण्यासाठी कित्येक प्राणी, पक्षी यांच्या जीवाशी खेळतात.

असेच एक उदा. म्हणजे आज भर उन्हात करल फाटा (उरण ) रोड च्या खाली नाल्या मध्ये एक पर्यटक पक्षी (रानकोंबडा ) पतंग च्या मांज्या मध्ये पंख गुंतून तडफडत पडलेला. परंतु देव बलवन्त तर काय होईल याचे भान नसते आणी तेच झाले सर्वजण त्या पक्षाची तडफडत असल्याची दृश्य बघत होते. योगायोगाने तिथे एक माणूस आला तो माणूस म्हणजे चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण चे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू. त्याने एका मिनिटाची वाट न बघता लगेच नाल्यामध्ये जाऊन त्या पक्षाला बाहेर काढले. आणी खूप मेहनतीने त्या पक्षाच्या भोवती गुंडाळलेला पतंगचा मांज्या (नायलॉन चा दोरा ) काढला आणी त्याला मुक्त केले.

तो आकाशात उडून गेला. जाताना निश्चित देवाजवळ बोलत असेल की, विकास कडू सारखे समाज सेवक पावला पावलावर कर. हे दृश्य बघणाऱ्यांनी विकास कडू यांचे टाळ्या वाजवून धन्यवाद दिले. तेव्हा विकास कडू यांनी सर्व पतंग उडवणाऱ्या जनतेला आव्हान केले की, तुमची मज्या होते परंतु कोणा प्राणी, पक्षाचे जीव जाते हे खेळ करू नका !

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.