Press "Enter" to skip to content

शिवनेरी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आ. महेंद्रशेठ दळवी यांची तुला

  • राजा केणी यांच्या मेहनतीमुळे या मतदारसंघाची धुरा माझ्या खांद्यावर आहे : आ.महेंद्रशेठ दळवी 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔶🔷

अलिबाग- मुरुड मतदार संघात राजा केणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे तसेच या मतदारसंघातील जनतेनी मला भरभरुन दिलेले प्रेम मी कदापि विसरु शकत नाही त्यांच्या मेहनतीमुळेच मी आमदार झालो असल्याचे वक्तव्य आ. महेंद्रशेठ दळवी यांनी केले.

शिवनेरी नवरात्रोत्सव मंडळ नवीन वाघविरा तळेश्वर वाडी आयोजित राजा केणी यांनी आ.महेंद्रशेठ दळवी यांची फळ, फुले आणि मठाई ठेवून तुला करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, येणारा काळ आपल्यासाठी चांगला आहे आज सरकार आपले आहे कोरोनाच्या या महामारीत सरकार खंबीरपणे उभा आहे. पुढील चार वर्षात संपूर्ण बॅकलॉग पूर्ण करण्यात येईल. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार झाला पाहिजे हे स्वप्न राजा केणी यांनी पाहिले होते आणि ते सत्यात उतरल्याने राजा केणी यांची इच्छा पुर्ण झाली आहे त्यामुळे हा उपक्रम माझ्या कायम स्मरणात राहणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

तर या मतदारसंघातील विस वर्षीची सत्तापरिवर्तन आम्ही करून दाखवली आहे. आमदार महेंद्रशेठ दळवी हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हीताची जपणूक करणारे असून तळागाळातील लोकांपर्यंत आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटविला असल्याचे सांगून या देवीकडे विभागातील जनतेने व मंडळाच्या सदस्यांनी ग-हाणे मांडले होते ते पुर्ण झाल्याने आमदार दळवी यांची तुला करण्यात आली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा तालुकाप्रमुख राजा केणी यांनी सांगितले.

यावेळी माजी जि.प. सभापती संजय जांभळे, सरपंच मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मंडळ तसेच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.