सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । 🔶🔷🔶
दुर्गामातेला कमळपुष्प वाहण्याची प्रथा असल्याने सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात देवीच्या पुजेकरीता कमळ भक्तांकडून खरेदी करताना बाजार पेठेत पहावयास मिळत असून यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून विक्रीतून आदिवासींना रोजगारांचा प्रश्न मार्गी लागत असून तर भक्तांनी फुल देवीला अर्पण केल्यामुळे समाधान मिळते आहे.
कमळाचे फुल हे भारताचे राष्ट्रीय फूल असून धार्मिक, सांस्कृतिक मध्ये तसेच कमळ बहुगुणी असल्याचे आयुर्वेदानेही स्पष्ट केले आहे.दुर्गामातेला कमळ फुल वाहण्याची प्रथा असल्याने नवरात्रोत्सवात भक्तांकडून ते वाहण्याला प्राधान्य दिले जाते.तालुक्यातील विविध गावांमधील तलावात उमललेल्या कमळाचे दृश्य पाहून मन मोहून जाते.
त्याच प्रमाणे तलावात बहुरंगी फुले दिसतात.कमळाच्या लाल व उपल्या दोन जाती आढळतात. पाने गुळगुळीत, खाली लवदार असून देठ लाल नारंगी रंगाचा असतो. ही कमळ सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात उमलतात. उपल्या कमळाची पान वतरुळाकार असून पानाच्या खालच्या बाजूस ठिपके असतात.
जांभळी, फिकट, निळी, पांढरी, गुलाबी इ. विविधरंगी फुलांना मंद सुवास असतो. तलावातून कमळांची फुल गोळा करून बाजार पेठ , मुख्य रस्ता, सार्वजनिक स्थळी मोठय़ा प्रमाणात विक्री होत असल्याचे सध्या पहावयास मिळत आहे.







Be First to Comment