Press "Enter" to skip to content

शारदीय नवरात्रौत्सवा अंतर्गत भक्तीपथ पेज फेसबुक लाईव्ह कार्यक्रम

दु:ख दूर करण्यासाठी देवाला शरण जा : ह.भ.प.मारुती कोलाटकर महाराज 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷


जीवन हे सुख-दु:खाच्या धाग्यांनी विणलेले वस्त्र असून आपले दु:ख दूर करण्यासाठी देवाला शरण गेले पाहिजे अशाप्रकारचे भक्तीमय उद्गार किर्तनकार व समाजप्रबोधनकार ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर यांनी आपल्या किर्तनरुपी सेवेप्रसंगी काढले.
रोहे तालुक्यातील श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथे या निमित्ताने शारदीय नवरात्रौत्सवा अंतर्गत तपोपूर्ती नवरात्र महोत्सव निमित्त श्री क्षेत्र तुळजवाडी, खरवंडी कासार,अ.नगर यांच्या आदेशान्वये व नियोजित करण्यात आलेल्या भक्तीपथ पेज फेसबुक लाईव्ह कार्यक्रम अंतर्गत ह.भ.प.मारुती महाराज कोलाटकर यांच्या हरिकिर्तनरुपी सेवेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितीतांना प्रबोधन करताना ते बोलत होते.

येथे परंपरागत संपन्न होणाऱ्या नवरात्रोत्सव कार्यक्रम अंतर्गत दररोज अखंड नामस्मरण पहारा,हरिपाठ, ग्रंथराज ज्ञानेश्वर वाचन व जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात येत आले.

यावेळी पुढे कोलाटकर महाराज यांनी आदिशक्तीचे मदतीने हे विश्व निर्माण झाले आहे. त्यानंतर निर्माण झालेल्या मायेत जीव गुंतले गेले.जीव मायूत गुंतल्यानंतर देवापासून दूर गेले.अर्थातच देवापासून दूर गेल्याने दु:ख निर्माण झाले आहे. तर दु:ख निवारणासाठी देवाचे नामस्मरण करणे,देवाला शरण मनोभावे जाणे आवश्यक असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. या किर्तनरूपी सेवेप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.