पाच दिवसात पेन्शन देण्याचे तहसीलदारांचे आश्वासन 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔶
कर्जत तालूक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन मागील पाच महिन्या पासून मिळाले नाही अशा सर्व पेन्शन धारक विधवा परित्यक्ता, वयोवृद्ध नागरीकांनी आज तहसीलदार यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. पूढील पाच दिवसात पेन्शन जमा करण्यात येइल असा शब्द तहसीलदार यांनी दिला.
कोरोना संसर्ग टाळणेसाठी लागू केलेल्या लॉकडाऊन मूळे घरकाम करणा-या अनेक महिलांचे कामे बंद झाले आहेत, त्यायच पाच पाच महिने पेन्शन न मिळाल्या मूळे विधवा, परित्यक्ता व वयोवृद्ध नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिशा केंद्र या संस्थेच्या शिष्टमंडळासह तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेत निवेदन दिले. पेन्शन तात्काळ जमा करावे,पेन्शनचे अर्ज भरताना आधिका-यांनी लोकांना सहकार्य करावे, योजने ची जनजागृती करावी, बँका मध्ये पेन्शनधारकांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या.
या शिष्टमंडळात दिशाचे कार्यकर्ते अशोक जंगले, विमल देशमूख, अनिता जाधव, सम्युपदेशिका माधूरी कराळे यांच्या सह पाली, वैजनाथ कडाव, खरवंडी, सागंवी या गावातील पेन्शन धारक महिला उपस्थित होत्या.







Be First to Comment