सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । 🔷🔶🔷
शासनाच्या आदेशानुसार भारत सरकारने दिव्यांग कल्याणार्थ हक्क अधिनियम १०१६ नुसार भारतीय रेल्वे राज्यपरिवहन महामंडळ त्याचप्रमाणे महापालिका मधील बसेस येथे दिव्यांग व्यक्तिंना प्रवासभाडे सवलत देण्यात येतो. त्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तिंना राज्यातील बोट सेवेत प्रवास सवलत मिळावी अशी मागणी राज्याचे बंदरे व विकास मंत्री ना. अस्लम शेख यांच्याकडे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांनी केली आहे.
त्यामध्ये ते म्हणतात, रेल्वे आणि एस.टी.मध्ये अपंगांना जशी प्रवासी सवलत दिली आहे. त्याचप्रमाणे वेळ आणि पैसा वाचविण्याच्या दृष्टीने राज्यात अनेक ठिकाणी समुद्रकिनारी व नदीमध्ये प्रवासी बोटी चालविल्या जातात. यामध्ये अपंग बांधवांना सवलत मिळावी. असे निवेदन प्रधान सचिव परिवहन, बंदरे, गृहविभाग महाराष्ट्र शासन व मुख्य कार्यकारी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड मुंबई यांच्याकडे निवेदनाच्या प्रती सादर केल्या आहेत.







Be First to Comment