आदिवासी कातकरी समाजाचे हक्काचे समाजभवन 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶
सुधागड तालुक्यातील परळी विभागात लवकरच क्रांतिकारक हुतात्मा नागु कातकरी सामाजिक सभागृह साकारले जाणार आहे. परळी विभागातील 40 आदिवासी कातकरी वाड्यातील समाज बांधवांसाठी सामाजिक सभागृह उभारले जावे याकरिता आदिवासी बांधव मागील अनेक वर्षे प्रयत्नशील होते. लवकरच हे स्वप्न साकारले जाणार असून आपले हक्काचे भवन उभे राहणार असल्याचे आदिवासी कातकरी समाज नेते व कार्यकर्ते यांच्या परळीत पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट केले.
तत्कालीन आमदार धैर्यशीलदादा पाटील व शेकाप नेते सुरेशशेठ खैरे यांच्या प्रयत्नाने डोंगरी विकास कार्यक्रम 04 अंतर्गत आदिवासी सामाजिक सभागृहासाठी आमदार धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नाने 4 लाख 95 हजार 152 इतका निधी मंजूर झाला आहे.
परळी ग्रामपंचायत सरपंच संदेश कुंभार,माजी उपसरपंच ऍड प्रवीण कुंभार, माजी उपसरपंच दीपक गायकवाड, विद्यमान उपसरपंच महेश ठाकूर, विठ्ठल सिंदकर, अमोल देसाई, प्रकाश आवसकर, शेखर डोंगरे,सुनील गायकवाड, आदींसह आदिवासी समाजबांधव व मान्यवरांच्या उपस्थतीत आदिवासी सामाजिक सभागृहाच्या जागेचे भूमिपूजन झाले होते. आदिवासी सामाजिक सभागृहासाठी परळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चार गुंठे जागा उपलब्द करून देण्यात आली आहे.
सदर सभागृहाचे काम लवकरच पूर्णत्वास येईल असे सरपंच संदेश कुंभार यांनी स्पष्ट केले. यावेळी पार पडलेल्या बैठकित आदिवासी समाज भवन उभारणी बाबत चर्चा करून कमिटी स्थापन करण्यात आली.आदिवासी कातकरी बांधवांचे विविध प्रश्न व समस्या यावर चर्चा करीत त्यांना शासनदरबारी न्याय मिळवून देणेबाबत चर्चा करण्यात आली.

परळी ग्रामपंचायतीने आदिवासी सामाजिक सभागृहासाठी जागा उपलब्द करून दिल्याबद्दल ग्रामपंचायतीचे आभार माणण्यात आले.सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील डोंगर दर्याखोऱ्यात, जंगल रानावनात माळरान पठारावर मोठ्या प्रमाणावर आदिवासी कातकरी समाज वास्तव्यास आहे. परळी विभागातील आदिवासी बांधवांसाठी सामाजिक सभागृह असावे अशी सर्वांचीच इच्छा होती. अखेर ही स्वप्नपूर्ती होत असून लवकरच परळीत हुत्तामा नागु कातकरी समाज भवन साकारत आहे. हे समाजभवन सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्याचे केंद्रबिंदू ठरेल असे रमेश पवार म्हणाले.
या बैठकीस आदिवासी समाज नेते विष्णू वाघमारे, दगदु वाघमारे , रमेश पवार, अखिल भारतीय आदीवासी विकास परिषद कोकण संघटक रमेश पवार, सखाराम वाघमारे,रामचंद्र वाखमारे, मारूती घोगरकर, सोनु पवार, सोनू वाघमारे,सखाराम घोगरकर, हिरामण वाघमारे, गौरु जाधव, सखाराम जाधव, एकनाथ पवार, वसंत जाधव, बाळू हिलम, रमेश वाघमारे, बारकु वाघमारे, गणपत जाधव आदींसह आदिवासी कातकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीतील विविध विषयांना सर्वांच्या वतीने सोनु पवार यांनी अनुमोदन दिले. आभार प्रदर्शन सखाराम जाधव यानी केले.







Be First to Comment