Press "Enter" to skip to content

पालीत नवरात्रनिमित्त विधायक उपक्रम : शिक्षक कुणाल पवार यांची संकल्पना

सुधागड वाकणवाडी आदिवासीवाडी येथील गोर-गरीब,गरजू महिलांना मिळाली साड्यांची भेट 🔶🔷🔶

शिक्षक कुणाल पवार यांच्या समाजपयोगी उपक्रमाला पालीकरांचा उस्फूर्त प्रतिसाद 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

सुधागड तालुक्यातील वाकणवाडी आदिवासीवाडी येथे ‘नवरात्र उत्सवानिमित्त गोर-गरीब,गरजू भगिनींना साडी भेट देऊया; सामाजिक बांधिलकी जपूया’ या उपक्रमाअंतर्गत साडी वाटप करून पालीकरांनी अनोख्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला. या समाजपयोगी उपक्रमाचे पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

नवरात्र उत्सवामध्ये सधन घरातील महिला या 9 दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करत असतात.पण ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते.अशा महिलांना मात्र रोजच्या साडीची भ्रांत असते.आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या अशा भगिनी आणणार तरी कुठून ?

शिक्षक कुणाल पवार यांच्या ‘नवरात्र उत्सवानिमित्त गोरगरीब गरजू महिलांना साडी भेट देऊया;सामाजिक बांधिलकी जपूया’ या संकल्पनेला पालीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शिक्षक कुणाल पवार यांनी नवीन वा जुन्या पण चांगल्या,सुस्थितीत असलेल्या साड्यांचे संकलन केले.यात विक्रांत चौधरी,सतीश हुले,साक्षी ताई दिघे,सविता हंबीर,अंकित ओस्वाल,सरपंच रुचिता बेलोसे,सुलतान बेणसेकर,माजी सरपंच समृद्धी यादव,रोहिणी जाधव,शिक्षक कॉलनी,श्रीदत्त छाया अपार्टमेंट मधील रहिवासी यांनी आपल्याकडील साड्या देऊन वा इतरांकडून जमा करुन महत्त्वपूर्ण योगदान दिले असे कुणाल पवार यांनी सांगितले.

वाकणवाडी आदिवासी वाडी येथे सुधागड तालुक्याच्या नायब तहसीलदार वैशाली काकडे माजी सभापती साक्षी ताई दिघे यांच्या हस्ते महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवऋण प्रतिष्ठानचे केतन मस्के,सामाजिक कार्यकर्ते सुलतान बेणसेकर,बोरसे तलाठी, ग्रामपंचायत सदस्य भगवान दळवी,पोलीस पाटील पिंपळे व वाकणवाडी आदिवासीवाडी येथील सर्व महिला आवर्जून उपस्थित होत्या.

अशा प्रकारच्या समाजपयोगी उपक्रम राबवण्याची गरज आहे.गरजवंताला मदत करणे हाच खरा माणुसकी धर्म आहे. 


वैशाली काकडे,
नायब तहसिलदार पाली
गोर-गरीब गरजुंना साड्यांची भेट देऊन खऱ्या अर्थाने विधायक पद्धतीने नवरात्र साजरी झाली आहे.याचा आनंद आज मिळाला.


साक्षीताई दिघे,
माजी सभापती
या समाजपयोगी उपक्रमाला सर्वांचेच सहकार्य लाभले.सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला गेला.सर्वांचे मी आभार मानतो.

कुणाल पवार, आयोजक

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.