सिटी बेल लाइव्ह । उरण मधील नवशक्ति । लेखक – अजय शिवकर । 🔷🔶🔷
आजच्या देवीचे सातवे रूप
कालरात्रि
काल म्हणजे वेळ,समय.काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे.रात्री म्हणजे गाढ विश्रांती,शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती.विश्रांती शिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो कां?कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती.
आजची उरणची सातवी शक्ती
फुंडे गावची घुरबादेवी
एके काळी सर्वात जास्त शेतीचे पिक मिळणारा भाग म्हणजे फुंडे गावचा मुंज्याच्या आंज्याचा शेत माल भाग आता तेथे पुल ,काँलेज आहे. त्यावेळी शेतातच पूर्वीपासून एक देवीची मूर्ती होती.
तिच्याच मुळे गावाच संरक्षण व शेतीला जास्त पिक येते अशी लोकांची श्रद्धा होती. १९८४ ला प्रकल्पात जे भराव झाले त्यात देवीचे स्थान बुडाले म्हणून आधीपासुन तळ्यात मिळालेल्या कुमारीका माते समोर तिची स्थापना केली. त्यावेळच्या महादु भगत यांच्या करवी देवीने दोन्हीही एकच देवीची रूपं हे स्पष्ट केले.
त्यानंतर उत्तरेस असणाऱ्या जंगली ,ओसाड भागात असणाऱ्या काळभैरवाची (उजाड देव) पण स्थापना तेथेच केली. जुन्या लोकांची अशी भावना आहे की देवी कोणत्या ना कोणत्या रूपाने फिरुन गावाचे संरक्षण करते म्हणूनच ही घुरबादेवी.
उद्या शनिवार
२४/१०/२०२०
उद्याच्या देवीचे आठवे रूप — महागौरी
उद्या उरणची शक्ती…
डोंगरी गावची अंबाबाई
Be First to Comment