Press "Enter" to skip to content

मराठासेवासंघ संभाजी ब्रिगेड नवनियुक्त पदाधिकारी व कॅडर कॅम्प उत्साहात 

संभाजी ब्रिगेडची कोकणात जोरदार मुसुंडी : धडाडीच्या कार्यकर्त्यांवर सोपवल्या जबाबदाऱ्या 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तर्फे कोकण विभाग व रायगड जिल्हा उत्तर तर्फे प्रशिक्षण शिबिर व जिल्हा कार्यकारणी नियुक्ती उपक्रम कराडी समाज हॉल कामोठे येथे संपन्न झाला. 

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण दादा गायकवाड  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व कोकण प्रदेश अध्यक्ष शिवश्री सचिन जगदीश सावंत देसाई  यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा उत्तर पदाधिकारी नियुक्ती खालील प्रमाणे देण्यात आली. संभाजी ब्रिगेडने कोकणात जोरदार मुसुंडी मारली असून आता धडाडीच्या कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्याने ब्रिगेड आता  अधिक जोमाने उभारी घेणार  असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

यावेळी संभाजी ब्रिगेड ची भविष्यातील वाटचाल, संघटनात्मक बांधणी,  नियोजनबद्ध व कृतीशील उपक्रम , सामाजिक व जनहीतार्थ प्रश्नावर आंदोलने आदींबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शिवश्री जगदीश ठाकरे यांचे कोकण विभाग कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

 जिल्हा उत्तर अध्यक्ष  शिवश्री  विश्वनाथ नारायण मगर यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे शिवश्री सज्जन गवळी रायगड जिला उत्तर कार्याध्यक्ष, शिवश्री समीर म्हात्रे रायगड जिल्हा उत्तर उपाध्यक्ष, शिवश्री हेमंत पाटील  रायगड जिल्हा उपाध्यक्ष,  शिवश्री अनिरुद्ध जाधव जिल्हा कायदेशीर सल्लागार यांची जिल्ह्यावर निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे काही तालुका अध्यक्ष व तालुका कार्यकारणी यांचीसुद्धा निवड करण्यात आली .

 कर्जत तालुका अध्यक्ष म्हणून शिवश्री विशाल माळी, पनवेल तालुका अध्यक्ष  शिवश्री सुरेश गायकवाड , तसेच शिवश्री तानाजी माने यांची संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियन नवकार युनिट अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. शिवश्री राकेश घरत  संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियन सीबर्ड युनिट अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.  त्याचप्रमाणे रसायनी विभाग अध्यक्ष  शिवश्री केदार शिंदे यांची निवड करण्यात आली .

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी खालील मान्यवर पूर्ण महाराष्ट्रातून आले होते. शिवश्री प्रदीप कणसे महाराष्ट्र प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड, शिवश्री अनिल माने  सोशल मीडिया प्रमुख संभाजी ब्रिगेड, शिवश्री सुभाष सावंत नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष, शिवश्री भूषण शिसोदे रायगड जिल्हा दक्षिण अध्यक्ष, शिवश्री सतीश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ठाणे,  शिवश्री दीपक पहुरकर उपाध्यक्ष नवी मुंबई,   शिवश्री अमित पद्माकर नवी मुंबई संघटक, तसेच सर्व कार्यकर्त्यांचे कार्यकर्त्यांच्या उपस्थित मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियन कोकण विभागीय कार्यालय उद्घाटन करण्यात आले. तसेच संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियन व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड एकत्रितपणे येत्या आठवड्याभरात सर्व कामगारांचे प्रश्न घेऊन सी बोर्ड लॉजिस्टिक कंपनी उरण येथे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.