कर्जत तालूक्यातील कूपोषण कमी करण्यासाठी समन्वयाने काम करणार 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷
कर्जत तालूक्यातील कूपोषण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग,महिला बाल विकास, आदिवासी विकास विभाग व कँन प्रकल्प यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार केला.
आदिवासी विभागाचे मदतीने व आरोग्य व महिला बाल विकास च्या समन्वयाने पोषण हक्क गटाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रीशन -कँन प्रकल्पाच्या वतीने दि.12 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान तालूक्यातील 40 अगंणवाड्या मधुन राबवलेल्या कूपोषण निर्मुलन जनजागृती मोहीमेचा समारोप काल दि. 22 ऑक्टोबर रोजी कळंबोली कातकरवाडीत करण्यात आला.

या समारोप कार्यक्रमा निमीत्ताने आयोजित जनजागृती व मार्गदर्शन सोहळ्यास तालूका आरोग्य आधिकारी डॉ. सी. के मोरे, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प पेण चे निरिक्षक जगदिश भानूशाली, आय सि डी एस चे प्रकल्प आधिकारी अनिकेत पालकर, निशीगंधा भवाळ, साथी संस्था पूणे चे स्वनील, संरपच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
सुमतू हाँस्पिटल कर्जतचे संचालक डॉ. सूनील ढवळे यानी स्थानिक रानभाज्यातून मिळणारे पोषण मुल्य,लहान मूले व गरोदर महिलांनी आहार कसा व कोणता घ्यावा या बाबत मार्गदर्शन केले तर डॉ. ईश्वरी ढवळे यानी गरोदर काळात महिलांनी स्वत:च्या आरोग्याची पोषणाची काळजी कशी घ्यावी या बाबत मार्गदर्शन केले. तालूका आरोग्य आधिकारी यांनी दोन मूलातील अतंर, बालविवाह या कारणा मुळे कूपोषण वाढत असून आपल्या भागात बालविवाह रोखण्यासाठी समाजाने पूढाकार घेतला पाहिजे असे मत माडंले.
आदिवासी विकास चे निरीक्षक जगदीश भानूशाली, प्रकल्प आधिकारी पालकर व निशीगंधा भवाळ यांनीहीउपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच पूढील काळात आदिवासी विकास विभाग, महिला बाल विकास, आरोग्य विभाग व कँन प्रकल्पा मार्फत समन्वयाने काम करण्याचा निर्धार केला. उपस्थित महिलांना कँन प्रकल्पा मार्फत मास्क वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचा समन्वय अशोक जंगले यांनी केले. तर कँन चे कार्यकर्ते रवी भोई , शांताराम निरगूडा, जयराम पारधी, विमल देशमूख, दिशा च्या वैष्णवी दभडे, रेखा भालेराव, उज्जेन सिरसाठे, कृष्णा वाघमारे, संतोष देशमूख, स्थानिक अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
काय आहे कँन प्रकल्प
आदिवासी जिल्हे व आदिवासी उपाय योजनेतील अंगणवाडी मध्ये बालमृत्यू माता मूत्यू रोखणे, कूपोषण कमी करणे या उदेशाने महाराष्ट्रात 6 जिल्हे 10 तालूके व 420 अंगणवाडी मध्ये आदिवासी विकास विभागाचे मतीने व स्थानिक स्वंयसेवी संस्था मार्फत राबवला जातो.
कर्जत तालूक्यातील आदिवासी उपाय योजनेतील 40 अंगणवाडी मध्ये दिशा केद्र या संस्थेच्या वतीने कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रीशन -कँन हा प्रकल्प राबवला जात आहे.प्रत्येक महिन्यात 0 ते 6 वर्षा पर्यतच्या मूलांचे वजन उंची घेणे, मूलांची श्रेणी निश्चीत करणे, पोषण जनजागृती करणे, भारतरत्न डाँ. एपिजे अब्दूल कलाम अमृत आहार योजनेची पोषण हक्क गटा मार्फत देखरेख करणे आदी कार्यक्रम कँन प्रकल्पा मार्फत राबवले जात आहेत.







Be First to Comment