Press "Enter" to skip to content

खालापूर नगरपंचायतीचा कोरोना तपासणीचा तिसरा टप्पा सुरू


सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔶🔷

नगरपंचायत खालापूरने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनेनंतर तिस-या टप्प्याची आरोग्य तपासणीला सुरवात  केली आहे.

खालापूर नगरपंचायतीने सर्वात प्रथम एप्रिल महिन्यात घरोघरी आरोग्य तपासणीला सुरवात केली होती. जिल्हाधिकारी निधी चौधरी यानी मुख्याधिकारी सुरेखा भणगे आणि उपनगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्या कामाची खालापूरात येवून प्रशंसा केली होती.शासनाने माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिम अंतर्गत घरोघरी तपासणी मोहिमेला सुरवात केल्यानंतर खालापूर नगरपंचायत हद्दीतील 1463 कुटूंबातील सुमारे 5002 जणांची तपासणी केली.

महड गावात घरोघरी जावून तपासणी करताना नगरपंचायत कर्मचारी

यामध्ये दोन जण संशयित आढळल्यानंतर तपासणी नंतर ते कोरोना बाधित निघाले होते.नगरपंचायतीने पंधरा दिवसानंतर तपासणी मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू केला आहे.घरोघरी जावून तपासणी बरोबर कोरोनाबाबत जनजागृती देखील सुरू झाली आहे.

या मोहिमेत स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांचा सहभाग असून नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.

सुरेखा भणगे - मुख्याधिकारी खालापूर नगरपंचायत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.