सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । आवरे । 🔷🔶🔷
आवरे गाव हे धार्मिक श्रद्धेच देवस्थान आहे. गावात सिद्धेश्वर भोळेनाथ मंदिर , श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर , हनुमान मंदिर , श्री बाबदेवमंदिर व कुलपती कुलस्वामिनी पारंपरिक देव्हारे आहेत .साई राम साई श्याम साई महान शिर्डीके दाता सबसे महान ओंम साई राम शिर्डी ज्याचे लागतील पाय शातजन्म चे पातक दुःख क्लेश चिंता दूर होईल अशी आख्यायिका आहे. साई महिमा अगाध आहे श्रद्धा व सबुरी हा साई चा मूलमंत्र आणि ज्याने जीवनात अंगिकार केलं त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात आवरे गावात असलेलं साईमंदिर इथल्या पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धा स्थान होय !
इथं सदर मंदिराची स्थापना ही 1984 साली म्हणजे च 80 च्या दशकात केली आहे श्री साईची मूर्ती ही त्या काळात मुंबई चेंबूरहून आणलेली आहे दिनानाथ गावंड यांनी आणली आहे आवरे गावातील निस्सीम प्रतिष्ठित नागरिक दिनानाथ गावंड हे थोर साई भक्त होय साई वर दीनानाथ गावंड तसेच त्यांची सौभाग्यवती राजश्री गावंड व संपूर्ण परिवाराची यांची साई वर विशेष श्रद्धा होय तसेच या काळात दीनानाथ गावंड यांनी रामनवमी च्या शुभमुहूर्तावर सलग 5 दिवस धार्मिक चित्रपट हे साई भक्तांना मनोरंजन म्हणून पडद्यावर दाखवीले श्री रामनवमी ला साई मूर्तीची स्थापना केल्याने दरवर्षी श्रीराम नवमी ला मंदिराचा खास विशेष वर्धापनदिन साजरा केला जातो.

साई मंदिराचे महत्व हे विशेष आहे 1995 सलापासून नित्येनेमाने साईची महाआरती ही अजतायगत ठीक 7 वाजता सर्व साईभक्त करतात दीनानाथ गावंड याची जन्मभूमी ही आवरे गाव व व्यावसायिक कर्मभूमी ही मुंबई आहे सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्ध असले तरी अगदी सध्या व सरळ स्वभाव चे असलेले दीनानाथ गावंड हे साईभक्त होय.
मंदिरात साईची मूर्ती ही सुबक तसेच मनमोहक आहे मंदिरात साई महाआरती ची परंपरा ही स्थापनेपासून आजपर्यंत होत आहे बहुसंख्य साईभक्त हे मनोभावे साईची आरती करत असतात सुयश क्लासेस आवरे सर्वगुणसंपन्न असणारा क्लासेस होय क्लासेस तर्फे दरवर्षीप्रमाणे आरतीचा मान दिला जातो. या वेळी मंदिरात उपस्थित असलेल्या साईभक्त याना सुयश क्लासेस आवरे तर्फे नवीन वर्षाच्या दिनदर्शिका ह्या सोसिएल डिस्टन्स चा वापर करून देण्यात आल्या.

एकूण क्लासेस तर्फे सनातन संस्थेच्या 30 दिनदर्शिका वाटप केली सदर प्रसंगी मंदिरातील सर्व साई भक्त तसेच सुयश क्लासेस आवरे चे विद्यार्थी उपस्थित होते या नवरात्री विशेष अरतीसाठी आवरे गाव पंचक्रोशीतील उत्कृष्ठ असे पखवाज वादक नितेश गावंड यांनी तसेच महाआरती साठी प्रसाद क्लासेस ची विद्यार्थ्यांनि समीक्षा भोईर हिने केली. सुयश क्लासेस आवरे तर्फे साई भक्तांना दिनदर्शिका सप्रेम भेट देण्यात आली.







Be First to Comment