सिटी बेल लाइव्ह प्रस्तुत उरण मधील नवशक्ति । लेखक – अजय शिवकर । 🔷🔶🔷
आजच्या देवीचे सहावे रूप
कात्यायनी
देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत.कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात.विवाह म्हणजे संरक्षण,वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा.हि देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतिक आहे.
आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय.
आजची उरणची सहावी शक्ती
जसखार ची रत्नेश्वरी देवी

शेवा गावच्या जवळच असलेल्या जसखार या गावात रत्न सापडाव तशी तळ्याच्या पाण्यात एका भाविकाला ही पाषाण रूपी मूर्ती सापडली ती रत्नेश्वरी देवी,जे.एन पी.टी च्या प्रकल्पात अनेक गाव उठवून स्थलांतर करण्यात आली.
त्याच्यात जसखार ही गाव होत, १९८४ ला भराव होऊन गावाने स्थान सोडल पण देवीचे स्थान कायम तेथेच आहे, आता नवीन गावात तालुक्यातील सर्वात मोठे भव्य दिव्य स्वरूपातील मंदिरात देवीची अंश स्वरूप मूर्ती आहे. पण कोणत्याही पुजा अर्चनेचा पहिला मान आधीच्या जागी द्यावा लागतो.
( टिप : काही कारणास्तव सदर भाग काल प्रकाशित होऊ शकला नाही, तो आज प्रकाशीत करण्यात आला.)







Be First to Comment