विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर थेट ‘PROMOTED (COVID 19)’चा शिक्का
सिटी बेल लाइव्ह / अमरावती #
कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या वर्गात ढकलले जाणार आहे त्यामुळे यावर्षीची बॅच ही कोरोना बॅच म्हणून ओळखली जाईल असा विनोद आजपर्यंत केला जात होता परंतु आता मात्र हाच विनोद सत्यात उतरविला आहे तो अमरावतीच्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ हॉस्टिकल्चर’ च्या प्रशासनाने !
आज अमरावतीच्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ हॉस्टिकल्चरच्या B’Sc हॉर्टीकल्चरच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचा एक फोटो समोर आला. या फोटोत गुणपत्रिकेवर थेट ‘PROMOTED (COVID 19)’ असं नमूद करण्यात आलंय. अकोला महाविद्यालया अंतर्गत हे कॉलेज येतं. या कॉलेजमधील २४७ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘PROMOTED (COVID 19)’ असा शिक्का मारण्यात आलाय.
कृषी मंत्र्यांनी केली कारवाई :
या प्रकरणी आता कृषिमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॉलेजकडून देण्यात आलेल्या जुन्या गुणपत्रिका परत घेऊन विद्यार्थ्यांना नवीन गुणपत्रिका दिल्या जातील असं दादा भुसे म्हणालेत. सोबतच दादा भुसे यांनी महाराष्ट्रातील कृषीसंबंधित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील आश्वस्त केलंय. कोणत्याच कृषी विद्यापीठाच्या गुणपत्रिकांवर ‘PROMOTED (COVID 19)’ असं लिहिलं जाणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. सोबतच हा प्रकार ज्याने केला असेल किंवा ज्याच्याकडून हा प्रकार घडलाय त्यांची चौकशी करून याबाबत कारवाई केली जाणार असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय.
Be First to Comment