Press "Enter" to skip to content

सुनिता गायकवाड यांनी पार पाडली कोरोना योध्याची भूमिका

के.जे. सोमय्या हॉटस्पीटलमध्ये मावशीचे काम करतात सुनिता गायकवाड


सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)-

परिस्थिती माणसाला कशी धीरोदात्तपणे उभी करते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुनिता राजू गायकवाड यांना पाहिलं की लक्षात येईल. पुर्वी केवळ गृहीणी म्हणून काम करणारी व आपला संसार व परिवार या चाकोरी पलिकडील जीवन माहीती नसलेली सुनिता गायकवाड आज पति निधनानंतर एक खंबीर पणे ताठ उभी राहून आपल्या संसाराला सावरतांना पाहताना तीचं खरंच कौतुक करावेसे वाटते.     

    पुर्वीची लाजरी, बुजरी, घाबरी सुनिता आज परिस्थितीचे घाव सहन करत ताठ उभे राहीलेली पाहून तिच्या मैत्रिणींना ही तिचे कौतुक वाटत आहे. आपला संसार सांभाळण्यासाठी ती के जे सोमय्या हॉटस्पीटलमध्ये आया अथवा मावशीचे काम करतात. आता कोरोनाचा या काळात सुनिता ताई स्वतः च दुःख पार विसरून गेल्या असून त्या या कोरोनाग्रस्त रूग्णांची आपुलकीने सेवा करतांना दिसतात. त्यांची आस्थेने चौकशी करतात. सामान्य माणूस जिथे जवळ जायला घाबरतो तिथे सुनिता ताई कामावर चोवीस चोवीस तास हसत हसत या रुग्णांची सेवा करताना दिसतात. इतकच काय एखाद्या कोरोना ग्रस्ताचा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह काळजी पुर्वक बॅगमध्ये पँक सुध्दा आता त्या करतात. पुर्वी याच सुनिता ताई कुणाकडे काही झालं तर जायला सुध्दा घाबरायच्या.आज याच सुनिता ताई परिस्थीती पुढे हतबल न होता धीटपणे उभे राहून आपलं दुःख विसरून समाजासाठी कोरोना योद्ध्याची भुमिका ताठपणे निभावत असल्याने त्यांचे समाजातून कौतुक होत आहे.          

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.