Press "Enter" to skip to content

गुड न्यूज : उरणमध्ये आज फक्त २ पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶

उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. ही उरणकरांसाठी समाधानकारक गोष्ट आहे. आज दिवसभरात फक्त २ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर ४ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.

आज एकूण पॉझिटीव्ह २०४५, उपचार करून बरे झालेले १८४२, उपचार घेणारे ९६, मयत १०७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज जेएनपीटी द्रोणागिरीमध्ये २ पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर द्रोणागिरी ३, काळाधोंडा २ असे ४ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा अतिशय कमी म्हणजे फक्त २ जणांचा आला आहे. तसेच उपचार करून घरी सोडलेल्यांचा आकडाही फक्त ४ जणांचा आहे. तसेच मयत कोणीही नाही ही उरणकरांसाठी समाधानकारक गोष्ट मानली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.