Press "Enter" to skip to content

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम ठप्प..!

बेग कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांपासून पगार नाही 🔶🔷🔶

कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्या लताताई कळंबे यांचे पाली तहसील कार्यालयाच्या दारात ठिय्या 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

वाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम बेग कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. मात्र या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांपासून पगारच दिलेला नाही. त्यामुळे आक्रमक झालेले कर्मचारी काम बंद करून पगार मिळण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या लताताई कळंबे यांच्या समवेत गुरुवारी (दि.22) पाली तहसील कार्यालयाच्या दारात ठिय्या मांडून बसले होते.

पाली खोपोली मार्ग प्रारंभीपासूनच विविध समस्या व वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना पगार दिला नाहीत तर अधिक व्यापक स्वरूपात आंदोलन  करू असा इशारा मनसे जिल्हा सचिव लताताई कळंबे यांनी दिला.

   पगार देण्याचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय काम सुरू करणार नाही असे यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर सामाजिक कार्यकर्त्या लताताई कळंबे यांनी सांगितले की गेल्या 6 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार नाही. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. या कर्मचाऱ्यांना तातडीने पगार मिळून या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम देखील लवकर करण्यात यावे अशी मागणी लताताई कळंबे यांनी केली. 

बेग कन्स्ट्रक्शन कंपनीचे हे सर्व कर्मचारी आहेत. एमएसआरडीसीचा त्यांच्याशी थेट संबंध नाही. तरी देखील कंपनीला पत्र व नोटीस देऊन पगार काढण्यास सांगितले आहे. येत्या 2 दिवसांत कर्मचाऱ्यांना पगार दिला जाईल असे आश्वासन बेग कन्स्ट्रक्शन कंपनीने दिले आहे.

सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी
पगार मिळावा यासाठी तहसील कार्यालयाच्या दारात बसलेले बेग कन्स्ट्रक्शन कंपनीचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.