चार्टर्ड प्रेसिडेंट प्रकाश जैन यांचे सहकार्य 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
जागतिक पातळीवर काम करणारी संस्था असलेल्या लायन्स क्लब कडून सेवा सप्ताहाचे आयोजन दरवर्षी संपुर्ण जगभर करण्यात येते. नागोठणे लायन्स क्लब कडूनही यावर्षी कोरोना अवेअरनेस या मुख्य उपक्रमासह पर्यावरण जनजागृती, अन्नदान, मधुमेह, कर्करोग, डोळ्यांचे शिबीर, वृक्षारोपण हे कार्यक्रम सर्वत्र राबविण्यात आले.
याच सेवा सप्ताहाचा एक भाग असलेला अन्नदान हा उपक्रम नागोठणे लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष लायन प्रकाश जैन यांनी नुकताच आपल्या स्वखर्चातुन केला.
नागोठणेतील एक दानशुर व्यक्तीमत्व, अडीअडचणीत उपयोगी पडणारे, बऱ्याच गरिब गरजू लोकांचे मोतिबिंदू ऑपरेशन मोफत करून देणारे, क्लबसाठी तसेच गावातील एक आदर्श व्यक्तीमत्व प्रकाश जैन यांच्या माध्यमातून ३०० पेक्षा जास्त लोकांना अन्नदानाचा लाभ घेतला. विशेषतः नागोठणे पोलीस स्टेशन मधील सर्व स्टाफ यांचीही सेवा करण्याचा लाभ लायन सभासदांना मिळाला.
नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लावण्यात आलेल्या या अन्नदान स्टाॅल सेवेचा आदिवासी, भाजी – फळविक्रेते, दुकानदार , एसटी स्थानकावरील प्रवासी या सर्वांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन संदिप नायर, उपाध्यक्ष लायन संतोष झोलगे , अॅक्टीव्हीटी चेअरमन लायन यशवंत चित्रे, डिस्ट्रीक्ट चेअरमन एमजेएफ लायन सुधाकर जवके, पास्ट प्रेसिडेंट लायन सुजाता जवके, सचिव एमजेएफ लायन विवेक सुभेकर, खजिनदार लायन संतोष शहासने, लायन सुनिल कुथे, लायन विवेक करडे, लायन श्वेता सुभेकर, लायन गणेश जाधव, लायन रमाकांत काळे तसेच सामाजिक कार्यकर्ते अनंत वाघ, लिलाधर तुरे, प्रतिभा तेरडे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नागोठणे व पंचक्रोशी मध्ये सातत्याने सामाजिक बांधीलकी जपणा-या नागोठणे लायन्स क्लब या अग्रगण्य संस्थेकडून विविध शैक्षणिक, क्रिडा स्पर्धा आयोजन, महिला-वयोवृध्द-लहान-मुलांसाठी अवेअरनेस कॅम्प, मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य शिबीरे वर्षभर राबविली जात असतांनाच लायन्स क्लबने नागोठण्यात राबविलेल्या अन्नदान उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.








Be First to Comment