Press "Enter" to skip to content

पाली तहसील कार्यालयासमोर शेतकर्‍याचे आमरण उपोषण सुरू

बिल्डरच्या विरोधातील भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच..! प्रकृती खालावली 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

सुधागड तालुक्यातील भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांनी बिल्डर पागुर देसाई यांच्या विरोधात सोमवार (दि.19) पासून पाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी देखील प्रशासनाकडून मागण्यांसंदर्भात कोणत्याही हालचाली होतांना दिसत नाहीत. अद्यापपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले आहेत.  तसेच  उपोषणकर्ते पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

       बिल्डर पागुर देसाई याने शेतकरी पवार यांची तलाठी सजा आवंढे येथील स्वतः च्या मालकीच्या सर्वे नं 104 ची जागा हडप करून  शासनाची दिशाभूल करण्याकरिता सन 2010 रोजी खोटे बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले ते प्रतिज्ञापत्र बिल्डर पागुर देसाई यांनी स्वतःच्या नावाने घेतले असून शेतकरी चिंतामण पवार यांच्या नावाने बनविले गेले आहे. तसेच प्रतिज्ञापत्रात शेतकरी व त्यांच्या बहिणींच्या खोट्या सह्या व राहण्याचे ठिकाण यात तफावत असून ते प्रतिज्ञापत्र मुदत बाह्य असल्याचे दिसून येत आहे असा आरोप चिंतामण पवार यांनी केला आहे.

        अनेक प्रश्नांवर उपोषणकर्ते यांनी प्रशासनाला जाब विचारला. उपोषणकर्ते हे मणक्याच्या आजाराने त्रस्त आहेत हे प्रशासनाला माहित असून सुद्धा प्रशासन याचे गांभीर्य घेत नसल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी केला. उपोषणाचा चौथा दिवस सरला असतांना देखील प्रशासन मूग गिळून गप्प का? प्रशासनाने उपोषणकर्त्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.