सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔶🔷🔶
कोव्हिडं-19 च्या कार्यकाळात, निसर्ग चक्रीवादळ आणि सृष्टीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत सन्मानपत्र रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या हस्ते जिल्हाधिकारी नियोजन भवनात देण्यात आले.
मागील सहा महिन्यापासून प्रसाद ठाकूर हे जिल्हा माहिती कार्यालयात सोबत व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफीच्या कामात सहभागी आहेत. या कार्यक्रमात कधीही केव्हाही कार्यालयाचा आदेश येताच प्रसाद जिल्ह्यातील त्या त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ शूटिंग जिल्हाधिकारी रायगड जिल्ह्यातील तहसीलदार प्रांताधिकारी आणि मंत्र्यांचे दौरे येथील काम याने अतिशय चांगल्या प्रकारे केल्यानेच जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सन्मानपत्र देऊन प्रसाद ठाकुर यांना गौरविण्यात आले.
भविष्यात त्यांच्याकडून अशाच प्रकारची शासनाला मदत होऊ अशी अपेक्षा जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केली आहे. अलिबाग शहरांमध्ये प्रसाद ठाकुर हे फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग ऑनलाइन वर्किंग अगदी तरुणांसाठी तरुणींसाठी टायपिंग चे काम दिवस-रात्र करतात. व्हिडिओ शूटिंग मध्ये अतिशय कल्पक आणि अभ्यासू असल्यामुळेच सरकारी व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी त्यांना खास सर्व ठिकाणावरून आमंत्रित करण्यात येते. त्याचबरोबर लग्न समारंभ विविध कार्यालयाच्या मीटिंग येथेही त्यांना पाचारण करण्यात येते. शासनाकडून त्यांना मिळालेल्या या विशेष कार्याबद्दल सन्मानपत्र मिळाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.








Be First to Comment