Press "Enter" to skip to content

कर्जतकर म्हणतात, तहसीलदार साहेब..उघडा डोळे, बघा नीट !

चक्रीवादळामुळे नुकसान झालेले अनेक नागरिक भरपाईच्या प्रतिक्षेत 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔶🔷🔶

वातावरणात झालेल्या बदलामुळे व समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने एप्रिल महिन्यात वादळ – वारा – पाऊस यांचा एकत्र मारा तयार होऊन चक्रीवादळ संपूर्ण कर्जत तालुक्यात झाले, या चक्रीवादळमुळे अनेक नागरिकांच्या घराचे नुकसान झाले . मात्र अद्यापी या नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई मिळाली नाही . कर्ज काढून त्यांनी आपल्या घरांची डागडुजी केली होती ,आज सहा महिने होऊन ही नुकसान भरपाई कधी मिळणार ?तहसीलदार साहेब उघडा डोळे, बघा नीट , अशी संतापजनक टाहो नागरिक फोडत असून लवकरात – लवकर नुकसान भरपाई द्यावी , अशी मागणी कोठींबे – कशेळे येथील नागरिक करत आहेत .

कोटींबे – कशेळे तसेच आजूबाजूचा परिसर हा जंगल- माळरान परिसर आहे . त्यामुळे एप्रिल २०२० रोजी झालेल्या चक्रीवादालामुळे येथील अनेकांना याचा फटका बसला . अनेकांच्या घरावरचे छप्पर उडाले , कौले फुटली , भिंती कोसळल्या , घरांवर झाडे पडली , त्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले . सरकारी बाबू येऊन पंचनामे करून गेले ,त्यानंतर नागरिकांनी कोरोना काळात गाठीशी पैसा नसल्याने उसनवारी – कर्ज काढून तर प्रसंगी सोने तारण ठेवून डोक्यावर छप्पर तयार केले . मात्र आज चक्रीवादळ होऊन पाच ते सहा महिने झाले तरी नुकसान भरपाई मिळाली नाही, की साधी या चक्रीवादळमुळे झालेल्या नुकसानीची चर्चा, बातम्या देखील कुठे होताना दिसत नाहीत . कर्जतचे मा. तहसीलदार अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईचा हिसाब – किताब सांगतात. मग चक्रीवादळमुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत का बोलत नाहीत ? अद्यापी भरपाई का आली नाही ? असा संतापजनक सवाल करत असून, तहसीलदार साहेब , उघडा डोळे – बघा नीट , असा टाहो कोटींबे – कशेळे या परिसरातील नागरिक करत आहेत .

चक्रीवादळ संपूर्ण कर्जत तालुक्यात झाला असल्याने चक्रीवादळमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्या , अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिक करत आहेत .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.