सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶
झोतिरपाडा शिहू विभागाचे शिवसेना पक्षाचे उप विभाग प्रमुख आणि रोहा तालुका कोळी समाज उपाअध्यक्ष आणि रिलायन्स कंपनीचे कामगार नेते अशोक भाई भोय यांची स्थानिक भूमिपुत्र कंत्राटी कामगार महासंघ ” या युनियनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ज्येष्ठ कामगार नेते श्री.साधूराम भाई मालुसरे यांनी सदरची बिनविरोध निवड करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडीनंतर कामगारांच्या न्यायहक्कांसाठी व हितासाठी तन मन धनाने झोकून देऊन काम करणार असल्याची ग्वाही भोय यांनी दिली.

अशोक भोय हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व कामगार चळवळीत झोकून देऊन काम करीत आहेत. कामगार वर्गाचे विविधांगी प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी युनियनच्या माध्यमातून ते प्रभावीपणे काम करीत आहेत. कामगारांवर अन्याय अत्याचार झाल्यास त्यांच्या न्यायहक्कांसाठी लढा उभारत प्रत्येकाला न्याय देण्याचे काम ते करीत आहेत.
अशोक भोय यांच्या या निवडीने कामगारांमध्ये प्रचंड उत्साह व न्यायाची भावना निर्माण झाला आहे. स्थानिक भूमिपुत्र कंत्राटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी अशोक भोय यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







Be First to Comment