सिटी बेल लाइव्ह प्रस्तुत उरण मधील नवशक्ति । लेखक – अजय शिवकर । 🔶🔷🔶
आजच्या देवीचे पाचवे रूप
स्कंदमाता
स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे.बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे.सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे.
स्कंद म्हणजे तज्ञ,निष्णात.सामान्यपणे जे तज्ञ,प्रविण असतात ते उद्धट असतात. पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे.
देवीच्या या रुपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात.
आजची उरणची शक्ती आहे
नवीन शेवा ची शांतेश्वरी देवी
उरण जवळच असलेले नवीनशेवा गाव म्हणजे पहिले जंगलाने आच्छादलेले शेवागाव.
गावातून दुसऱ्या गावात जाणे म्हणजे जंगलाचा रस्ता ,हिंस श्वापदांची भीती ,त्यात एक वाघ नेहमीच येणा-जाणाऱ्यांवर झडप घालायचा. भीतीच्या छायेत असणाऱ्या गावकऱ्यांनी देवीची उपासना केली व देवीने वाघाला अद्दल घडवून हद्पार केले व गावाला शांत केले म्हणून ही शांतेश्वरी देवी. आजही जुन्या शेवा गावी वाघ देवीच मंदिर आहे.
उद्या गुरूवार
२२/१०/२०२०
उद्याच्या देवीचे सहावे रूप — कात्यायणी
उद्याच्या देवीची माहिती — जसखार ची रत्नेश्वरी देवी
Be First to Comment