Press "Enter" to skip to content

उरणमध्ये २ पॉझिटीव्ह तर तिघांचा मृत्यू

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह फक्त २ जण सापडले आहेत. आज उपचार करून ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज ३ जण कोरोनाने मयत झाले आहेत.

आज एकूण पॉझिटीव्ह २०४३, उपचार करून बरे झालेले १८३८, उपचार घेणारे ९८, मयत १०७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज उरणमध्ये जेएनपीटी न्हावा शेवा १, सोनारी १ असे २ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. डोंगरी १, म्हातवली १, सातराठी उरण ४, डाऊर नगर ३, आवरे १, म्हात्रे वाडी उरण १ असे एकूण ११ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर बोकडविरा १, दत्तकृपा वैभव सोसायटी १, पिरकोन १ असे ३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा अतिशय कमी म्हणजे फक्त २ जणांचा आला आहे. तसेच उपचार करून घरी सोडलेल्यांचा आकडाही ११ जणांचा आहे. तर ३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे उरणच्या जनतेने सावध रहाणे गरजेचे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.