सह्याद्री प्रतिष्ठान कडून पालकमंत्री अदिती तटकरे यांना निवेदन 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पेण । प्रशांत पोतदार । 🔶🔷🔶
निसर्ग चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे रायगड तसे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र(पेण) यांच्याकडून करण्यात आली आहे.
याबाबतची मागणी प्रत्येक जिल्ह्यातून करण्यात येत आहेत.रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राचे उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांनी निवेदन देऊन शेतकऱ्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षा बाबत लक्ष वेधले आहे.कोरोना, लॉकडाऊन, अतिवृष्टी आणि परतीच्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या होत असणाऱ्या आत्महत्या तसेच मागे झालेला पुर आणि जून महिन्यातील निसर्ग चक्रीवादळात झालेला नुकसानी बाबत शासनाचे शेतकऱ्यांकडे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे तसेच मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे काढणीला तयार झालेले पिक शेतीमध्येच कोलमडून पडल्याने आणि शेतामध्येच भर पावसात चिखलात भिजून कुजल्याने शेतकऱ्यांची वर्षभरातील मेहनत वाया गेली आहे आणि वर्षभर खते बियाणे मजुरी आधी वर केलेला खर्च देखील फुकट गेला आहे.
आता तरी शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे आणि व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष वेधून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्था संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावात जिल्ह्यात करीत आहे तरी शासनाने याची योग्य दखल घ्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.पेण येथील कार्यक्रमाप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले आहे.








Be First to Comment