Press "Enter" to skip to content

रायगडातील भाजपच्या तीनही आमदारांचा पत्रकार परिषदेत एल्गार

तटकरे यांच्या राजकीय दबावामुळे पेण मुख्याधिका-यांची गटनेते यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल 🔶🔷🔶

न्याय मिळविण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरणार : आमदार प्रशांत ठाकूर 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔶🔷🔶

16 ऑक्टोंबर रोजी झालेल्या पेण नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील नरदास चाळीतील अनधिकृत बांधकामाबाबत नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपल्यावर आरडाओरड करून तसेच शिवीगाळ करता शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गटनेते यांच्या विरोधात पेण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र ही तक्रार पालकमंत्री आणि खा. सुनिल तटकरे यांच्या राजकीय दबावाखाली येऊन केली असल्याचा आरोप पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

राजकारण हे नेहमीच होतच असते मात्र असा प्रकारे सुडाची भावना ठेवून हे राजकारण करीत असतील तर येत्या काळात जनता त्यांना धडा शिकवेल महाराष्ट्रात अनेक महानगरपालिकेच्या सभागृहात असे प्रकार घडतात मात्र हि घटना निंदनीय असून उलट मुख्याधिकारी यांनी प्रोसिंडिंग बदलायला लावली असल्याने त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई व्हावी याकरीता आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी करणार आहोत. त्यामुळे भाजपच्या गटनेत्यांना न्याय मिळावा करीता भाजप रस्त्यावरची लढाई लढेल असे आ. प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

तर महाराष्ट्रातील ही एकमेव घटना आहे की मुख्याधिकारी या राजकीय दबावाला बळी पडून राजकारण करीत आहेत एकीकडे चक्रीवादळामुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून त्याकडे लक्ष न देता तटकरे सुडाची भावना ठेवत आहेत मात्र भाजप त्यांना लोकशाही मार्गाने दाखवून देईल असे आ.महेश बालदी यांनी सांगितले.तर आ. रविशेठ पाटील म्हणाले की प्रशासनाची चुकीची भुमिका आहे कोणतीही शहानिशा न करता दबावाखाली येऊन एवढ्या जलदगतीने तपास चक्र फिरवित आहेत.

या पत्रकार परिषदेला आ.रविशेठ पाटील आ.प्रशांत ठाकूर आ.महेश बालदी नगराध्यक्षा प्रितम पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील सरचिटणीस मिलिंद पाटील बंडू खंडागळे दर्शन बाफना भास्कर पाटील रविकांत म्हात्रे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.