शेतकरी कामगार पक्ष कर्जत तालुका पुरोगामी युवक संघटनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून शासनाच्या वतीने लवकरात लवकर भरपाई मिळून देण्यात यावी या मागणीसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्ष कर्जत तालुका पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने कर्जत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पुरोगामी युवक संघटना कर्जत तालुका अध्यक्ष वैभव भगत, कर्जत तालुका पुरोगामी युवक संघटनेचे खजिनदार महेश म्हसे, कर्जत तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुशील कालेकर, उमरोली वार्ड अध्यक्ष जयेंद्र कराळे, पाथराज वार्ड अध्यक्ष आदित्य गायकवाड, जिल्हा चिटणीस मंडळ अध्यक्ष मंगेश खेडकर, सावेले वार्ड अध्यक्ष महेश कोळंबे, सावेले जि. प.वार्ड दिलीप शेळके, पक्षाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग बदे व दत्ता सुपे उपस्थित होते.








Be First to Comment