सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह फक्त २ जण सापडले आहेत. आज उपचार करून ९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.
आज एकूण पॉझिटीव्ह २०४१, उपचार करून बरे झालेले १८२७, उपचार घेणारे ११०, मयत १०४ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज उरणमध्ये आज मोरा रोड सागर अपार्टमेंट १, बोकडविरा १ असे फक्त २ जणच कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर चिरले १, द्रोणागिरी मार्केट उरण १, द्रोणागिरी १, करंजा २, उरण ३, आवरे १ असे एकूण ९ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा अतिशय कमी म्हणजे फक्त २ जणांचा आला आहे. तसेच उपचार करून घरी सोडलेल्यांचा आकडाही बऱ्यापैकी तर कोणीही मयत नाही. यामुळे उरणच्या जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.








Be First to Comment