Press "Enter" to skip to content

पेण नगराध्यक्षा प्रितम पाटील यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्लाबोल

जनतेच्या हिताची कामे करत असताना प्रशासन अधिकाऱ्यांचा अडथळा : नगराध्यक्षा प्रितम पाटील

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔶🔷🔶

पेण नगरपालिका हद्दीतील नरदास चाळ येथील रहिवासी रंजना बांदिवडेकर यांनी बांधलेल्या अनाधिकृत बांधकामामुळे तेथील सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. याबाबत येथील नागरिकांनी मागील तिन वर्षा पासून नगरपालिकेत तक्रारी अर्ज केले आहेत. या विषयी 16 ऑक्टोंबर रोजी स्थायी समितिच्या बैठकीत सदर आनाधिकृत बांधकामा बाबत गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना विचारले असता त्यांनी या बाबत उडवाउडविची उत्तरे दिली. त्याचप्रमाणे सदर बांधकामाला प्रथम असेसमेंट उतारा देण्यात येईल असे सांगितले. अशाप्रकारे अनाधिकृत बांधकामांना नोटीस दिली जाते यामुळे जनतेच्या हितासाठी काम करीत असतांना प्रशासनाच्या अधिकारी अर्चना दिवे यांचा अडथळा येत असल्याचे नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पेण नगरपालिकेत मागिल 8 ते 9 वर्षांपासुन आम्ही जनतेची प्रामाणिकपणे सेवा करीत आहोत. मात्र अनाधिकृत बांधकामाबाबत तक्रारी वाढत असल्याने मुख्याधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे नुकताच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोणताही गदारोळ अथवा कुठलाही अनुचित प्रकार घडला नसुन मुख्याधिकारी यांनी विनाकारण गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्या विरोधात पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र जनतेच्या हितासाठी असे अनेक गुन्हे दाखल झाले तरी चालतील असेही त्या यावेळी म्हणाल्या. त्यामुळे ही लोकशाहीची हत्या आहे. मुख्याधिकारी यांनी प्रशासनातील कर्मचारी यांना मिटिंगमधील प्रोसिडिंग मध्ये बदल करण्यास सांगितले. यामुळे जर प्रशासन अधिकारी असे करीत असतील तर लोकप्रतिनिधींनी दाद कोणाकडे मागायची असे त्यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष वैशाली कडू, सभापती राजेश म्हात्रे, अश्विनी शहा, दर्षण बाफणा आदि उपस्थित होते.

 स्थायी समितीच्या बैठकीत घडलेला प्रकार हा प्रोसिडिंगमध्ये मांडलेला आहे बाबत मी कोणत्याही कर्मचा-यांवर दबाव आणलेला नाही.
र्चना दिवे ---- मुख्याधिकारी पेण नगरपरिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.