सिटी बेल लाइव्ह । उरण । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
प्राथमिक शिक्षकांचे व राजकीय पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शक सेवानिवृत्त शिक्षक नेते दा. चां. कडू गुरुजी यांचा ८४ वा वाढदिवस कोरोनाच्या महामारीमुळे घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला. आजही त्यांच्या कामांची पद्धत तरुणाला लाजवणारी अशी आहे.
शिक्षकीपेक्षा स्वीकारल्यापासून आपल्या पेशात इमानदारीने काम करीत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमीच त्यांची धडपड सुरू असते. त्यांनी अनेक शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे काम कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केली आहेत. त्यामुळे एखाद्या शिक्षकाचे कोणतेही काम अडले असेल ते सर्वप्रथम कडू गुरुजींकडे धाव घेत असतात. तसेच त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना भाषण करण्यापासून मार्गदर्शन केले आहे. आज ते मोठे राजकीय नेते म्हणून गणले जात आहेत. मात्र ते आवर्जून कडू गुरुजींचा उल्लेख करीत असतात.

आज जरी ते शिक्षकी पेक्षा मधून सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांच्यातील काम करण्याची उमेद त्यांना स्वस्थ बसून देत नाही. आजही ते तरुणाला लाजवेल अशाप्रकारे भर उन्हातान्हात शासकीय कार्यालयातील अधिकारी वर्गाला ठणकावून सांगून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या कार्याचा अनेकांना हेवा वाटत आहे.
असे व्यक्तिमत्व असलेले शिक्षकनेते दा. चां. कडू गुरुजी यांचा ८४ वा वाढदिवस कोरोनाच्या महामहारीमुळे गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी अनेकांनी फोनद्वारे व सोशल मिडीयामार्फत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकांचे आधारस्तंभ शिक्षक नेते दा. चां. कडू गुरुजी यांच्या कार्याला तोड नाही. त्यांनी अनेक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांचे कार्य वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या सारख्या अनुभवाची आम्हांला नितांत गरज आहे. यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईशवर चरणी प्रार्थना अशा शुभेच्छा शिक्षकनेते कौशिक ठाकूर यांनी दिल्या.








Be First to Comment