सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनील ठाकूर । 🔶🔷🔶
काल रात्री ९च्या सुमारास उरणच्या साई मरीनयार्ड जांभुळपाडा येथे दुर्मिळ (मांडूळ) दुतोंड्या बिनविषारी साप आढळला . किशोर नरेश म्हात्रे , शरद हरिदास घरत , प्रल्हाद घरत , अमित पाटील (जांभूळपाडा ) यांनी प्राणीमित्र आनंद मढवी यांना कळविले असता
प्राणीमित्र बंटी शेळके , पंकज घरत , सुमित मढवी , दिलीप मढवी , धर्मेंद्र मढवी, विनीत मढवी , शुभम मढवी यांनी साप दुर्मिळ (मांडूळ) दुतोंड्या बिनविषारी सापास कडून याची पूर्ण माहिती वनविभागाला मेजर किरण देवकर , मेजर सूरदास धांडे , वनरक्षक मिलिंद भोईर यांना लगेचच दिली .व हा दुर्मिळ जातीतील दुतोंड्या साप दुधेला जंगलात वनरक्षकान समवेत सोडण्यात आले.
सोडते वेळेस मेजर सूरदास धांडे प्राणीमित्र आनंद मढवी , नितीन मढवी , अमित पाटील , बंटी शेळके , शुभम मढवी , पंकज घरत , निखिल मढवी , विनीत मढवी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था उरण रायगड सदस्य उपस्थित होते .








Be First to Comment