Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी

कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔶

परतीच्या मुसळधार पावसाने कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसिलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड, ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण, तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सागर शेळके, कर्जत विधानसभा युवा महिला संघटक प्रतिक्षा लाड, वकील राजेंद्र निगुडकर, शहनवाज पानसरे, विलास खाडे, संतोष थोरवे, ऋषीकेश भगत, योगेश थोरवे, जहिर खान आदीनी नायब तहसीलदार विजय चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

15 ऑक्टोबर पासून राज्यात पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने कर्जत तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील भात शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे तयार झालेल्या भाताच्या दाण्यात खाली पडल्यामुळे कोंब फूटले असून कापणी केलेले भाग शेतातच कुजले आहे, हजारो एकर मधील भाताचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला असून त्यांना शासनाकडून मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. म्हणून नुकसानग्रस्त शेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या अति वृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्यात येऊन शासनातर्फे मदत करण्यात आली परंतु त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मदत मिळालेली नाही तरी उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा त्वरित मदत देण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.