युवक राष्ट्वादी काॅग्रेसच्या रक्तदान शिबिरातील रक्त आले कॅन्सरग्रस्त मुलांच्या कामी 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठणे विभाग युवक राष्ट्वादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातील रक्त नेरुळ (नवी मुंबई) येथील डाॅ. डी. वाय. पाटील मेडिकल काॅलेज व हाॅस्पीटल मधील कॅन्सरग्रस्त मुलांच्या तत्काळ उपयोगाला आल्याची माहिती हाॅस्पीटल प्रशासनाकडून देण्यात आल्याचे युवक राष्ट्वादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळे यांनी सांगितले.
विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या १५ आॅक्टोबरला संपन्न झालेल्यस वाढदिवसानिमित्त नागोठणे विभाग युवक राष्ट्वादी काँग्रेस कडून व डाॅ. डी. वाय. पाटील मेडिकल काॅलेज व हाॅस्पीटल मधील रक्त पेढीच्या सहकार्याने रविवार दि. १८ आॅक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १०० पिशव्या रक्त जमा करण्याचा संकल्प युवक राष्ट्वादीच्या नागोठणे विभागातील कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या नियोजनाच्या बैठकीत केला होता.
मात्र रक्तदान शिबिरासाठी मिळालेल्या रक्तदात्यांच्या उस्फूर्त सहभागामुळेच १०२ पिशव्या रक्त जमा करण्यात युवक राष्ट्वादीच्या कार्यकर्त्यांना यश आले होते. आता हे रक्त कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपयोगास आल्याने आ. अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे सार्थक झाल्याची भावना युवक राष्ट्वादीचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळ यांनी व्यक्त केली.








Be First to Comment