सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷
खांब विभागात नवरात्रौत्सवास मोठ्या धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात प्रारंभ करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर या वर्षी उत्सवाचा थाट माट कुठेही दिसून येत नाही. तर गावागावातील ग्रामदेवता तसेच भावकींचे देव घटी बसले आहेत.

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने गावागावात मांगल्य व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शासकीय नियमानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रत्येक गावातील ग्रामस्थ या उत्सवात सहभागी झाला आहे. कोरोनामुळे दरवर्षी मंदिरात मोठ्या प्रमाणावर असलेली रेलचेल व संपन्न होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा अभाव दिसून येत आहे. तर गावातील ठराविक ग्रामस्थ एकत्र येऊन हा उत्सव साजरा करताना दिसत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी रंगणारे दांडिया न्रुत्यही रद्द करण्यात आले असल्याने तरुणाईचाही देखील हिरमोड झाला असल्याचे पहावयास मिळत आहे.तर मंदिरात नित्यनियमाने सकाळी देवतांचे पूजन,आरती,अखंड नामजप पहारा,तर सायंकाळी हरिपाठ व रात्री जागर भजन आदी धार्मिक कार्यक्रम नित्यनियमाने सूरु आहेत.








Be First to Comment