सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
युवासेनेच्या १० व्या वर्धापनदिना निमित्त युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने रायगड जिल्हा विस्तारक जयेश पाटील त्याचप्रमाणे राजिप सदस्य किशोर जैन व युवासेना रायगड जिल्हा अधिकारी सुधीर ढाणे यांच्या मार्गदर्शना खाली प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे युवासेना नागोठणे यांच्या तर्फे सॅनिटाइजर स्टँड व मास्क भेट म्हणून देण्यात आले.
या कार्यक्रमास वैदयकिय अधिकारी डॉ.चेतन म्हात्रे व आरोग्य सहाय्यक यशवंत करजेकर, सौ.नमिता म्हात्रे, हेमंत लांगी, आर.एन कदम, भाऊ आमडोसकर, भावेश पवार, उल्हास पिंगळे त्याचप्रमाणे ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर सांळूखे, युवा सेना रोहा तालुका समन्वयक शेखर जोगत, तालुका चिटणीस कु आकाश मढवी, नागोठणे विभाग चिटणीस कु. प्रणव रावकर
नागोठणे युवासेना शाखा अधिकारी कु. दिनेश वादळ, संदेश पोटे, उपशाखा अधिकारी प्रमोद नागोठणेकर, युवासेना चिटणीस व युवासैनिक अल्विन नाकते आदींसह युवासैनिक उपस्थित होते.
युवा सेनेचा १० वा वर्धापन दिन नागोठण्यातील सर्व युवासैनिकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.








Be First to Comment