सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १९ जण सापडले आहेत. आज उपचार करून ६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही. पॉझिटीव्ह मधील एकूण १९ पैकी १८ जण नागाव मधील असल्याचे समजते.
आज एकूण पॉझिटीव्ह २०३९, उपचार करून बरे झालेले १८१८ उपचार घेणारे ११७, मयत १०४ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज उरणमध्ये फक्त १ उर्वरित १८ जण हे नागावमधील असल्याची धक्कादायक माहिती शासकीय यंत्रणेने दिली. तर म्हात्रे कॅआदी करंजा १, सुरकीचापाडा करंजा १, बोकडविरा १, नागाव १, म्हातवली नागाव १, केगाव १ असे ६ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज मयताचा आकडा शुन्य आहे.
उरणमध्ये कोरोनाचा आकडा कमी असून तालुक्यातील उरण शहरात १ तर नागावमध्ये १८ जण पॉझिटीव्ह सापडल्याने खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवात पॉझिटीव्हचा आकडा वाढला होता. आता नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यामुळे जनतेने सावध राहून सोशल डिस्टंट पाळणे गरजेचे बनले आहे.








Be First to Comment