लोंब्यामध्ये दाणा तयार होतांना बळीराजा धास्तावले : नवरात्र उत्सवात पावसाचे विघ्न 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पातळगंगा । 🔷🔶🔷
परतीच्या पावसाची दहशत मुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सकाळ पासून रणरणत्या उन्हाचा सामना करावा लागत असून तीन वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाट सह पावसाच्या जोर दार सरी येत असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणी सापडले गेला आहे.

भातामध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असतांना त्यातच पावसाचे जोरदार तांडवामुळे भात शेती पडत आहे.यामुळे परतीचा पाउस शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. त्याच बरोबर सध्या नवरात्र उत्सव सुरु असतांना पावसाचे आगमन होत असल्यामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे.तीन वाजल्यापासून सोसायट्याचा वारा समवेत विजेच्या गडगडात जणू कानढळ्या बसणारा आवाजामुळे नोकरदारांची मोठी तारांबळ उडत आहे.दिवस भर कडक उन्हामुळे प्रत्येक जण हैराण होत असून सायंकाळी मात्र थंड गारवा मुळे शेतकरी वर्गांची झोप उडवून दिली आहे.
एक ते दिड आठवड्यात भात कापणी सुरु होत असतांना त्यातच भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार होत असल्यामुळे पावसाच्या मुळे भात शेती पडत असून हीच स्थिती अजून काही दिवस राहिल्याने भात शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याचे शेतकरी वर्गांचे म्हणणे त्याच बरोबर भात कुजली जावू शकते यामुळे हातामध्ये हवे तेवढे दाणा मिळणार नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.








Be First to Comment