Press "Enter" to skip to content

डोलवी ग्रामपंचायतीच्या नविन कार्यालयाचे शानदार उद्घाटन

  • डोलवी ग्रामपंचायतीचे कार्यालय म्हणजे मिनी मंत्रालय — आमदार रविशेठ पाटील 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔶🔷🔶

पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या डोलवी ग्रामपंचायतीचे नुतन कार्यालय म्हणजे मिनी मंत्रालय आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या जनतेला न्याय देण्याची भूमिका आपण ठेवून अधिक विकासात्मक कामे करावी असे प्रतिपादन पेण विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री तथा आमदार रविशेठ पाटील यांनी केले.

पेण तालुक्यातील डोलवी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामनिधी व जेएसडब्ल्यु कंपनीच्या सीएसआर फंडातून बांधण्यात आलेल्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन आज आ. रविशेठ पाटील, आ.अनिकेत तटकरे, माजी आ.धैर्यशिल पाटील यांच्या हस्ते शानदार करण्यात आले.

यावेळी बोलतांना माजी आ. धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, डोलवी गाव हे राजकिय व आर्थिक ताकदिची त्यामुळेे या गावाने आपला उत्तम ठसा डोलवीने उमटवलेला आहे या नुतन कार्यालयातील कारभार हा तळागाळातील लोकांच्या विकासाला हातभार लावणारा असावा असे आवाहन केले तर आ.अनिकेत तटकरे म्हणाले कि या डिजीटल युगात डोलवी ग्रामपंचायतीच्या नुतन कार्यालयाची वास्तू ही महाराष्ट्रात पहिली इमारत असेल असं मला वाटतं डोलवी गावाच्या यात्रेतील डोलकाठी प्रसिध्द आहे त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना एकाच व्यासपीठावर आणण्याची ताकद डोलवी गावातच आहे आपल्या गावात सुसज्य इमारत बांधल्याने सरपंच वनिता अनिल म्हात्रे व त्यांचे सहकारी यांचे सर्व मांन्यवरांनी कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जि.प. सदस्य प्रभाकर म्हात्रे, जेष्ठ नेते बाळाजी म्हात्रे,जेएसडब्ल्यु कंपनीचे अधिकारी आत्माराम बेतकेकर, विनायक दळवी,सरपंच वनिता म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हात्रे, परशुराम म्हात्रे, पं.स. सदस्य प्रदिप म्हात्रे, सुरेश म्हात्रे,माजी सरपंच धर्माजी म्हात्रे,कल्पना ठेमकर,वडखळ सरपंच राजेश मोकल, बाळाराम पाटील,गडब सरपंच अपर्णा कोटेकर आदिंसह ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामसेवक उपस्थितीत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.