खासदार सुनिल तटकरे, रायगड जिल्हाअध्यक्ष सुरेशभाऊ लाड, आमदार अनिकेत तटकरेंची उपस्थिती 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । रामचंद्र घोडमोडे । 🔷🔶🔷
राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक श्रीवर्धन मध्ये संपन्न झाली. श्रीवर्धन नगरपरिषद शाळा क्र 1च्या सभाग्रूहात पार पडलेल्या सभेला संबोधित करताना आमदार अनिकेत तटकरे यानी कार्यकर्त्यांनां जनतेमध्ये मिसळून जनतेच्या समस्या जाणून कामे करण्याचे सुचविले.
पक्षाच्या विविध सेलच्या संघटनेत प्रत्येक कार्यकर्त्याला स्थान दीले जाईल ते जाबबदारीने सांभाळून जनतेची कामे करावीत असें सांगितले.कर्जतचे माजी आमदार व राष्टवादी कॉग्रेस चे जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ लाड आपले विचार मांडताना कै.रवींद्र राऊत कै. बापू करडे यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत पक्ष वाढी साठी केलेल्या कामाचा उल्लेख केला. तसेच कार्यकर्त्यांनां मार्गदर्शन केले .
खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधकांना सध्या चालत असलेल्या राजकारणावर चिमटा घेत. सभागृहात जमलेल्या कार्यकर्त्यां कडे पाहत मी केलेल्या कामाची पोच पावतीच उभी आहे असें सांगितले आई सोमजाई चरणी देशावर असलेले कोरोना संकट दुर करून जनतेच्या तोंडावर असलेले माक्स लवकर निघू दे अशी प्रार्थना केली .कार्यकर्त्यानी नव्या उमेधेणे पक्ष वाढी साठी काम करावे. तरुणानां रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पर्यन्त करणार असल्याचे सांगितले.
यावेळी रायगड जिल्हा यूथ कमेटीचे सर्व पदाधिकारी, श्रीवर्धन तालुका पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य. जिल्हा परिषद सदस्य, नगरपरिषदचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक, सभापती तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment