सरचिटणीसपदी परेश सिलिमकर यांची निवड 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । रोहा । मिलिंद अष्टिवकर । 🔷🔶🔷
रोहा अष्टमी संत रोहिदास समाज विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नेहमी सामाजिक कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेणारे अजिंक्य रोहेकर तर सरचिटणीसपदी परेश सिलीमकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संत रोहिदास सभागृह महात्मा फुले नगर रोहा येथे संपन्न झालेल्या समाजाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
रोहा अष्टमी शहर संघटनेच्या विद्यमान कमिटीची मुदत संपल्याने याबैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष दर्शन कदम व सुनिल भोईरकर,खजिनदार रवींद्र पेंणकर, सहचिटणीस मयुरेश अष्टीवकर, सहखजिनदार अल्पेश पेणकर, संदेश वाहक गणेश अष्टीवकर व प्रसाद रोहेकर तर विवेक रोहेकर यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सल्लागार मंडळाचे नव्याने पुनर्रचना करण्यात येऊन त्यामध्ये समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक काशीनाथ नांदगांवकर, भगवान पेणकर, नथुराम रोहेकर, श्रीकांत मुरूडकर, सुरेश रोहेकर, कमलाकर रोहेकर, रवींद्र पेणकर आणि रुपेश नांदगावकर आदींचा समावेश करण्यात आला आहे.

बैठकीत नियमित कामकाजासह आयत्या वेळीच्या विषयांवर विचारविनिमय झाले. यानिवडी नंतर मावळते अध्यक्ष रूपेश नांदगांवकर यांनी अजिंक्य रोहेकर यांच्याहाती सूत्रे दिली. तर बैठकीला ज्येष्ठ काशीनाथ नांदगांवकर, भगवान पेणकर, श्रीकांत मुरूडकर, सुरेश रोहेकर आदींनी मार्गदर्शन केले. बैठकीला रोहा तालुका चर्मकार समाज संघटनेचे सहचिटणीस राजन बिरवाडकर, दिपक अष्टीवकर, नरेश रोहेकर, सुनील अष्टीवकर, गणेश नागोठकर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवड प्रक्रियेनंतर अध्यक्ष अजिंक्य रोहेकर आणि सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे रोहा तालुका चर्मकार समाजाचे अध्यक्ष समीर चंद्रकांत नागोठकर आणि सरचिटणीस गणेश चांदोरकर यांनी अभिनंदन केले. तर रायगड जिल्हा चर्मकार संघटनेचे उपाध्यक्ष दिपक आंबडकर आणि जिल्हा सहचिटणीस दिलीप पाबरेकर आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.







Be First to Comment