जाँइन्स ग्रुप मुंबई, ग्रामपंचायत शिरसे व सुमंतु फाऊंडेशन चा संयुक्त उपक्रम 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह। कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔶
कर्जत तालूक्यातील पंचवीस आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना आज मुंबई येथील सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत सायकल वाटप करण्यात आल्या, मुलीच्या शिक्षण विना ब्रेक नियमीत चालू रहावे या उदेशाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुलीने व्यक्त केले समाधान.
मुबंइ येथील जाईन्स ग्रूप आँफ भायखळा,जाईन्स ग्रुप आँफ इनलँड सिटी जाईन्स ग्रुप माझगाव ग्रिन व कर्जत येथील सुमंतू फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने कर्जत मधील ज्येष्ठ उद्योजक संतोष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत शिरसेच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तमनाथ आदिवासी वाडीतील समाज मंदिरात झालेल्या कार्यमास जाईन्स ग्रुप आँफ भायखळाच्या रिझवाना लोखंडवाला, जाईन्स ग्रूप आँफ इनलँड सिटी चे मुर्तूझा घडीयाली, जाइन्स ग्रूप आँफ माझगाव ग्रीनचे आर्वा राजकोटवाला, शिरसे ग्रामपंचायतीच्या संरपच आरती भोईर, कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक उमेश गायकवाड, दिशा केंद्रा चे सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले, सुमंतू फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ.सुनील ढवळे आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते.
ज्या मुली वाडी पासून दोन तीन किमी अंतर पायी चालत शाळेत जातात अशा मुली साठी मुबंई येथील सामाजिक संस्था च्या मदतीने रिसायकलीग प्रकल्पाच्या वतीने मोफत सायकल वाटप करण्यात आले. शिरसे, तमनाथ कातकरवाडी, जांभुळवाडी, संजयनगर कातकरवाडी, बिड व पोसरी येथील 25 शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनीना मान्यवारांच्या हस्ते तमनाथ येथील समाज मंदिरात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात वाटप करण्यात आले .

संरपच आरती भोईर यांनी उपस्थित संस्थाचे विशेष आभार मानत सध्या शाळा बंद असल्याने मुलांना आँनलाईन आभ्यास करवा लागतो आहे, मात्र वाडी मध्ये अनेक कुटुंबाकडे मोबाईल नाहीत अशा मुलांसाठी आनंदी शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही ग्रामपंचायत मार्फत राबवणार आहोत या उपक्रमास पण सामाजिक संस्था नी मदत करावी अशी विनंती केली.ही विनंती जाईन्स ग्रुप ने मान्य केली असून लवकरच आनंदी शाळा या उपक्रमासाठी मोबाईल उपलब्ध करून देण्यात येतील असे जाहीर केले.
कर्जत नगर परीषदेचे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक उमेश गायकवाड यांनी मूबंई येथील संस्थाचे आभार मानत येणाऱ्या दिवाळी सणात आदिवासी वाड्या-वस्त्यावर आधिकाधिक मदत पोहचविण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न केले पाहिजे कारण कोरोना आजारा मूळे मागील सहा महिण्यापासून आदिवासी कुटुंबे रोजगारा पासून वंचीत आहेत, त्यांना या काळात मदतीची जास्त गरज आहे असे आवाहन केले.
दिशा केंद्राचे कार्यकर्ते अशोक जंगले यांनी या सर्व कार्यक्रमाचा समन्वय केला. तमनाथ वाडीतील सिता पवार, वामन पवार यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी प्रयत्न केले.








Be First to Comment