भवितव्याच्या काळासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था आणि सामाजिक संघटनांचे कार्य कौतुकास्पदच : खासदार सुनील तटकरे 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे । 🔷🔶🔷
कोविडच्या महामारीच्या संकटामध्ये लॉक डाऊनच्या कालावधी मधे आणि निसर्ग चक्रीवादळाने सबंध सहा तालुक्यात प्रचंड प्रमाणावर तडाखा दिला.आणि संकटात आपलं नुकसान झालेले घर पुन्हा उभे राहील की नाही अशी शंका प्रत्येकाच्या मनात आली. आदरणीय पवार साहेब,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार असतील राज्याच्या सरकारने यावेळी मदतीचा हात ही दिला.इतर वेळी मिळणाऱ्या मदतीच्या तिप्पट मदतीसाठी राज्य सरकारने सकारात्मक पाऊल टाकले.मात्र समाजामध्ये विविध प्रकारचे हात अशा रूपातून श्रम आणि दान करत असतात.याचाच प्रत्यय गावागावात तालुका तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून जे काही मदतीचे काम केलं गेलं याचे उत्तम पद्धतीचे उदाहरण आपण या चित्र फितींच्या माध्यमातून दाखवून त्याची योग्य ती दखल या उपक्रमाच्या माध्यमातून घेतली गेली.खरोखर या गोष्टीचं कौतुक करू तेवढं कमीच आहे आणि म्हणून भवितव्याच्या काळासाठी काम करणाऱ्या या सर्व सेवाभावी संस्था आणि सामाजिक संघटनांचे कार्य कौतुकास्पदच आहे असे परखड मत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले.
यंदाच्या दुहेरी संकटाच्या काळात आपल्या लोकप्रतिनिधींच्या पावलावर पाऊल ठेवून ज्यानी संकट ग्रस्तांना मदतीचा हात दिला अशा संस्थां आणि मंडळांचा आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.किल्ला येथील ओम नमः शिवाय मंगल कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील,तालुकाअध्यक्ष विनोद पाशिलकर,उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर,माजी उपनगराध्यक्ष मयुर दिवेकर,सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख,शंकर भगत,अनिल भगत,रोहिदास पाशिलकर,प्रदीप बामुगडे,यासह इतर मान्यवर उपस्थित होते.याठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

सेवाभावी आणि सामाजिक संघटना कार्याचे कौतुक करीत असताना ते पुढे म्हणाले की,गेल्या वर्षी जो सांगली आणि कोल्हापूर मधे महापूर आला तेंव्हा त्या पूरग्रस्तांना मदत केली या कार्याची दखल ही भवितव्याच्या काळामध्ये घेण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.अनिकेत तू भाग्यवान आहेस कारण तुझ्या मागे या सर्वांच्या आशीर्वादाची शिदोरी खूप मोठ्या प्रमाणावर तुझ्या पाठीशी आहे.असेच उपक्रम यापुढे तुमच्या माध्यमातून घेतले जातील तेंव्हा या सर्वांच्या मनातील कल्पना यापुढे कशा पद्धतीने साकारल्या जातील हा प्रयत्न करणे आवश्यक आहे.त्याच बरोबर पावलावर पाऊल अशी असंख्य लाखो पावलं पुढे चालत रहावी आणि हीच पाऊलवाट आपल्या आयुष्याची ठरावी असे खासदार तटकरे शेवटी म्हणाले.तर महेश बामुगडे यांनी प्रास्ताविकात आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात रोहा तालुक्यातील जैन समाज संघटना, वसुंधरा फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ रोहा तर माणगाव तालुक्यातील श्रीरामपूर सेवाभावी संस्था निजामपूर(मुंबई),मारुती फाउंडेशन (माणगाव)त्याचप्रमाणे तळा तालुक्यातील तळे तालुका मराठी पत्रकार संघ व म्हसळा तालुक्यातील ठाकरोली विभाग कुणबी समाज संघटना(मुंबई),तळवडे विभाग कुणबी समाज संघटना (मुंबई),कुंभार समाज उन्नती मंडळ (मुंबई) व श्रीवर्धन तालुक्यातील घासी समाज रायगड,जैन समाज संघटना,निगडी कुंभार समाज उन्नती मंडळ, वावे पंचतन ग्राम विकास मंडळ (मुंबई), वाळवटी एज्युकेशन मंडळ,डॉ.राजेश पाचारकर मित्र मंडळ, असोसिएशन फॉर न्यूट्रिशन अँड डेव्हलपमेंट अँक्शन अँड एम एम आर्किटेक अलिबाग हेल्थ ग्रुप फाउंडेशन (वेळास) या संघटंनांना गौरविण्यात आले.तर या पाच तालुक्यातून प्रत्येक तालुक्यात बेस्ट इन मध्ये रोहा तालुक्यातील सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान -रोहा,माणगाव तालुक्यातील मानव सेवा हीच ईश्वर सेवा -इंदापूर.तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना – तळा,म्हसळा तालुक्यातील रा.जी.प. शाळा कणघर विद्यार्थी व शिक्षक मंडळ,तर श्रीवर्धन तालुक्यातील श्री.काळभैरव देवस्थान व ग्रामस्थ मंडळ -कोंढे.या संघटनांना गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहकारी वर्गाने मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत दिघे तर उपस्थितांचे रुपेश बामुगडे यांनी आभार मानले.








Be First to Comment