Press "Enter" to skip to content

अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक व मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील : डॉ.संजय सोनावणे

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान समाजातील प्रत्येक घटकांच्या सर्वांगीण प्रगती व उत्कर्षासाठी सातत्याने योगदान देत आहे. येत्या काळात अल्पसंख्याक समाजाचे शैक्षणिक प्रश्न व विविधांगी समस्या सोडविण्यासाठी प्रतिष्ठान अग्रेसर व प्रयत्नशील राहणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संजय सोनावणे यांनी स्पष्ट केले.

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र, राज्य अल्पसंख्याक विभाग आणि स्थानिक अल्पसंख्याक प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक प्रतिष्ठानच्या कार्यालयात नुकतीच पार पडली. डाॅ.राजेश साखरे यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीस डाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे,राष्ट्रीय अध्यक्ष , डाॅ.राजेश साखरे, अध्यक्ष कोअर कमिटी, श्री. सर्फराज हाजू, राज्य प्रमुख अल्पसंख्याक विभाग, सौ. संजीवनी शिर्के, उपाध्यक्ष कोअर कमिटी, श्री संजय कदम राज्य सरचिटणीस, श्री. अल्ताफ सय्यद, सचिव अल्पसंख्याक विभाग श्री.नितीन जोशी , राज्य प्रमुख सामाजिक विभाग, श्री सचिन कांबळे सरचिटणीस कोअर कमिटी,श्री. इरफान तांबोळी अध्यक्ष पनवेल तालुका, श्री.रियाज कच्छी अल्पसंख्याक प्रतिनिधी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रथम मान्यवरांचा परिचय देऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बैठकीचे थोडक्यात प्रास्ताविक श्री सचिन कांबळे सरचिटणीस कोअर कमिटी यांनी केले. डाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी अल्पसंख्याक घटकातील मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी प्रश्नांवर सविस्तर विवेचन केले व मार्गदर्शन केले. श्री. अल्ताफ सय्यद राज्य सचिव यांनी मुस्लिम समाजातील शैक्षणिक स्थिती बाबत मनोगत व्यक्त करून त्याबाबत सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. श्री. इरफान तांबोळी यांनी रिक्षा चालक सद्या आर्थिक अडचणीत असल्याचे सांगितले. श्री. सर्फराज हाजू राज्य प्रमुख अल्पसंख्याक विभाग यांनी मुस्लिम समाजातील शैक्षणिक प्रश्न सोडविण्यात पुर्ण योगदान दिले जाईल असा विश्वास दिला. श्री. नितीन जोशी राज्य प्रमुख सामाजिक विभाग यांनी मुस्लिम बांधवांचे शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी मूलभूत उपाय करणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुस्लिम समाजातील बांधवांना प्रशिक्षण , मार्गदर्शन गरजेचे असल्याचे सौ. संजीवनी शिर्के उपाध्यक्ष कोअर कमिटी यांनी सांगितले. बैठकीतील विविध विषयांवरील चर्चेत सभाध्यक्ष डाॅ.राजेश साखरे, सचिन कांबळे,रियाज कच्छी यांनी भाग घेऊन मौलिक विचार मांडले. डाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मुस्लिम समाजातील शैक्षणिक प्रश्नांबाबत आश्वासन दिले की या समाजासाठी त्रिस्तरीय प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करून त्यासाठी तज्ञ व्यक्तींना पाचारण करून, संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे मुस्लिम बहुल वस्ती,मोहल्ले आणि गावांमध्ये नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी केली जाईल असे जाहीर केले. त्यासाठी राज्य स्तरावरील कमिटीची घोषणा केली. राज्य स्तरीय कमिटी मध्ये पुढील प्रमाणे पदाधिकारी आहेत. डाॅ.राजेश साखरे अध्यक्ष कोअर कमिटी, सर्फराज हाजू, राज्य प्रमुख अल्पसंख्याक विभाग, सौ.संजीवनी शिर्के,उपाध्यक्ष कोअर कमिटी , श्री.सचिन कांबळे सरचिटणीस कोअर कमिटी , श्री.अल्ताफ सय्यद राज्य सचिव अल्पसंख्याक विभाग, श्री नितीन जोशी राज्य प्रमुख सामाजिक विभाग, श्री. राजेंद्र बोहरा राज्य प्रमुख व्यापारी विभाग, श्री कुमार फणसेकर राज्य प्रमुख चित्रपट विभाग, श्री.सुनिल वाघपंजे अध्यक्ष पनवेल उपविभाग , श्री प्रदीप सोनावणे अध्यक्ष नवी मुंबई , श्री. इरफान तांबोळी अध्यक्ष पनवेल तालुका वरील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची विशेष समिती मुस्लिम बांधवांच्या शैक्षणिक प्रशिक्षणाबाबत नियोजन करील त्यासाठी त्यांना पूर्णपणे अधिकार दिल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जाहीर केले.

श्री नितीन जोशी यांनी आभार व्यक्त केले. सभाध्यक्ष डाॅ.राजेश साखरे यांनी बैठक संपल्याचे जाहीर केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.