सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार । 🔷🔶🔷
आरे काँलनी मराठी शाळा क्र.१ येथे शिक्षकी सेवेत कार्यरत असणाऱ्या स्मिता सुरेश करकरे यांनी आपल्या शिक्षकी सेवेतून नुकत्याच सन्मानाने स्वेच्छानिवृत्त घेऊन समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
गेली ३० वर्षे शिक्षकी सेवेत कार्यरत असणा-या स्मिता करकरे यांनी आपल्या सेवाकाळात विविध ठिकाणी अध्यापनाचे काम केले आहे.तर आरे काँलनी मराठी शाळा क्र.१ येथेही त्या बरीच वर्षे कार्यरत राहून शैक्षणिक कार्या बरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपले मोलाचे योगदान दिले.
सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व्रुंद यांच्याशी नेहमीच सलोख्याचे व सौदाहार्याचे संबंध जोपासून शालेय प्रत्येक उपक्रमात त्या नेहमीच सक्रीय असायच्या.आपल्या सुस्वभावाने विद्यार्थी वर्गातही त्या अतिशय प्रिय होत्या.त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीबद्दल त्यांना भावपुर्ण निरोप व शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी स्थानिक नगरसेविका श्रीमती रेखा रामवंशी,शाळेचे मुख्याध्यापक व सहकारी बंधू भगिनी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर आपल्या सेवानिवृत्त पूर्वीच त्यांनी स्वेच्छा निवृती घेतल्याने समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे कौतूक होताना दिसत आहे.








Be First to Comment