सिटी बेल लाइव्ह । पेण । प्रशांत पोतदार । 🔷🔶🔷
दर वर्षी दिमाखात साजरा होणारा पेण मधील कोबंडपाडयातील नवरात्री उत्सवाला यंदा ३० वे वर्ष होत आहे. यावर्षी उत्सव शासनाच्या आदेशा नुसार साधे पणात साजरा करण्यात येत आहे.
पेण तालुक्यात विशेषता देवीची १२ फुटाची मुर्ती असते तसेच दुर्गा देवीची मिरवणुक हि बघण्यासारखी असते परंतु नवरात्रोत्सव यंदा सोशल डिस्टन्स पाळून करण्यात येणार असल्याने पेण तालुक्यात हि नवरात्री उत्सव अत्यंत साधेपणात साजरा करण्यात येत आहे. यंदा देवीची मूर्ती ४ फुटाची असणार असुन रोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा आणि आरती करण्यात येत आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे मास्क सॅनिटाइझर आदिचे पालण करण्यात करण्यात येत असुन.कोरोना काळात ज्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडली जात आहे.
अशा कोरोना योध्यांचा उचित सन्मान करण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा गरबा , दांडिया रास सारखे कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रमाचे यंदा आयोजन करण्यात आलेले नाही तर दरवर्षी होणारी गर्दी पाहता ती टाळण्यासाठी भाविकांनी यंदा गर्दी करू नये असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. विशेषतः शासकीय सर्व नियमा नुसार यंदा भाविकांनी हार फुले प्रसाद ओटीचे साहित्य महाप्रसाद साहित्य आणू नये अशीही विनंती करण्यात आली आहे. तर नवरात्र उत्सवात देवी कोंबडवासिनी आईच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी गर्दी करु नये अशी नम्र विनंती मंडळाचे अध्यक्ष किरण बांधणकर आणि सचिव अरविंद आंबोलकर यांनी केली आहे








Be First to Comment