शेकापचे जेष्ठ नेते काका पाटील यांच्या मातोश्रीचा स्मृती दीन गरीब गरजूंना विविध वस्तूंचे वाटप करुन साजरा 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । रमेश थळी । उरण । 🔷🔶🔷
शतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते का का पाटील यांच्या मातोश्रीं चै द्वोरकाबाई पांडुरंग पाटील यांचा ५०वा स्मृती दीन आज १८ ऑक्टोबर २०रोजी सकाळी नागाव मांडलआली पाटीलवाडी येथे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला उरण पंचायत समितीचे सभापती एड सागर कडू, शिवसेचे उपजिल्हा प्रमुख नरेश रहालकर, म्हातवली सरपंच आंनद घरत,राजिप माजी सदस्य चारुदत्त पाटील आणा पाटील, नम्रता पाटील,पंचायत समिती माजी सदस्या माया पाटिल, यतीन पाटील,सागर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात पीरवाडी आदीवासी वस्तीवर जावून श्रीराज चॅरिटेबलट्रस्ट तर्फे लहान मुलाना खाउचे वाटप तर तरुण महिला वयवृद यांना सेनिटायझर, माक्स,चे वाटप करण्यात आले तर कोरोना च्या काळात ज्या सेविकांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र गावकर्याची सेवा केली अशा अशावर्कर महिलांना श्रीफळ साडी पुष्प व १०००रुपयाचा धनादेश देवून माया पाटील नम्रता पाटील यांनी सन्मान केला तसेच लोकडावून मधे ज्या गरीब विद्यार्थ्यांची शाळेची फी बाकी असलेली तीन महिन्यांच्या फीचा धनादेश एड सागर कडू यांच्या हस्ते पालकांना सुपूर्त करण्यात आला.

या प्रसंगी काका पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले की, राज्यात कोरोना रोगाचा पादुर्भावामुळे लोकडावून मुले सर्वात जास्त आर्थिक फटका गरीबांना बसला या परिस्थिती मुले मोल मजूरी करणारे यांना या संकटाचा सामना करावा लागला त्यांना काही प्रमाणात मदत करता यावी या अनुषंगाने आज आमच्या आईच्या ५० व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून आज अशा गरजूंना श्री राज चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मदतीचा हात देत आहोत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पाटील वाडीतील प्रफुल्ल पाटील,प्रतीक पाटील,संजय पाटील,प्रीतेश पाटील,अबोली सिद्धी पाटील,जे के म्हात्रे,हरेश्वर थळी ,गजानन म्हात्रे,माजी सरपंच हरेश्वर कातकरी यांनी परिश्रम घेतले तर आभार मास्टर श्रीयान पाटील याने मानले.








Be First to Comment