Press "Enter" to skip to content

नवरात्री विशेष : गावंड कुटुंबातील मोठा देव्हारा आहे श्रद्धेच स्थान

सिटी बेल लाइव्ह । आवरे । निवास गावंड । 🔶🔷🔶


घटस्थापणे पासून नवरात्री उत्सव हा सुरू होतो नवरात्री नव दिवस देवीच्या नावाने केलेलं जागर होय , उमा पार्वती , महिषासुर मर्दिनी अशी अनेक तिची नाव संपुर्ण भारत वर्षात हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो गावंड कुटुंबातील मोठा देवघर आहे श्रद्धेचा स्थान देव्हाऱ्यातूंन जी पहिली आरती च मान देऊन आवरे गावातील पारंपरिक होलिकेचे दहन होते.

देव्हारा चा विस्तार हा गावंड कुटुंब आणि त्यांचे असलेले हे वंशज यांच्या आगमनापासून देव्हारा ची स्थापना आहे आणि गावंड कुटुंबातील सर्व नातलग हे देव्हारा त जाऊन मनोभावे पूजा , अर्चना करत असतात सर्वानाचं हाकेला पावणार हे गावंड कुटुंबातील भक्तीचा श्रद्धास्थान होय.

वाईट विचार म्हणजेच माणसाचे सहा शत्रू काम,क्रोध,लोभ,मोह, मद,मत्सर असे षड् रिपु यांचे दहन आज होळी मध्ये केले जाते. असुर सम्राट हिरण्यकश्यपू ने आपला पुत्र भक्तप्रल्हाद याला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यात सफल होऊ शकला नाही कारण भक्त प्रल्हादाला स्वतः विष्णु वाचवत होता म्हणून आपली बहीण होलिका हिची मदत हिरण्यकशयपू ने घेतली. होलीका हिला वरदान होते की आगी मध्ये स्वतः न जळण्याचे परंतु भक्त प्रल्हाद हा विष्णुभक्त असल्यामुळे तो फक्त नारायण-नारायण असा नमस्मारण करून स्वतः चे रक्षण करत असे. प्रल्हादाचे नारायण रक्षण करतो आणि शेवटी वाईट संगतीच्या कारणाने होलिका जळून जाते. या जगात चांगली कामे टिकून राहतात आणि जो वाईट कर्म करतो तो नेहमी लयाला जातो अशी अख्यायिका आहे. पण होलिका ही माहेरवाशीण आहे आणि भावाला मदत करायला आली होती हे अजुन आपण विसरलो नाहीत म्हणून हजारो वर्षांपासून आपण ही परंपरा पाळत आलो आहोत.तिला साडी चोळीचा मान देतो,तिला घारी पापडीचा नैवेद्य देतो,पुरणपोळी देतो तसेच आपल्याकडे जे आहे त्यातील तिला थोडेसे वाहतो आणि तिचा निरोप घेतो.

अशाच प्रथे प्रमाणे दरवर्षी आवरे गावात गावंड कुटुंबीय फार पूर्वीपासून
होलिका उत्सव साजरा करतात.मठकर (जारीमरी आई देवस्थान ) चिदबादेवी देवस्थान , आणि बाबदेव आवरे देवस्थान हे गावंड कुटुंबातील लोक हे हाऊल चे मानकरी या वर्षीचा मान हा मठकर देवस्थान चा आहे आणि नैवद्य घेण्यासाठी पाली कुटुंबातील एक व्यक्ती पत्र्याच्या डब्बा घेऊन हक्काने नेवैद्य घेत असतो आवरे गाव आणि होळी ही खूप खूप जुनी अशी पारंपरिक प्रथा आहे पूर्वी शिमगा येण्या महिन्याच्या आधी लहानमोठे विविध मुखवटे आणि पारंपरिक वेशभूषा करून ढोल तासे घेऊन रात्री मनोरंजन करायला जात असत लोक सुद्धा त्यांचे स्वागत गुण्यागोविंदाने करत असत.

आवर्‍याच्या जंगलातून होळीका साठी सावरीच्या झाडाची निवड करतात. नंतर सर्वजण जमून तीचा अभिषेक करून मोठया सन्मानाने (ज्या कुटुंबियांची पाळी आहे) मोठ्या श्रद्धेने आणून जे होलिका उभी करण्याचे जे शेत आहे त्याला हेऊलखासर असे म्हणतात तिला सन्मानपूर्वक सजावट,आरास करून उभी करतात सर्व नागरिक मोठ्या संख्येने आणि भक्ती पूर्व तीची पूजा करतात आणि मोठया उत्साहात घोषणा देतात आणि होलिकाला अग्नी चरणी साश्रू नयनांनी निरोप देतात.अशी परंपरा आज पर्यंत चालू आहे. हॉलिकेचे दहन हे जेव्हा गावंड कुटुंबातील सर्वात पहिला देव्हारा( म तु गावंड गुरुजी यांचे घर) यांच्या घरातून अभिषेक पूर्ण महाआरती आणून होलीकेची आरती दरवर्षी प्रमाणे गावंड कुटुंबतील प्रथे प्रमाणे जयवंती रामनाथ गावंड व रामनाथ काशिनाथ गावंड या यांनी मनाने आरती हॉलिकेचे स्थळी आणली नंतर आरती सुरू होत असताना आरती संपेपर्यंत हॉलिके सभोवताली गोल गोल फेऱ्या मारत असतात.

सर्व ग्रामस्थ मोठ्या भक्तीमय वातावरणात करत असतात आणि बरोबर मध्यरात्रीच्या सुमारास हॉलिकेचे दहनासाठी संपुर्ण गावातील नागरिक लाकूड आणण्याची प्रथा आहे होलीकेचे दहन केले जाते आणि होलीकेची रक्षा अंगाला किंवा घरी घेऊन येत असतात व जळालेली होळी ही आवरे तलावात सोडून देत असतात आणि होलीकेचा दुसरा दिवस म्हणजेच धुळवड रंगपंचमी खेळत या दिवशी ढोल ताशे घेऊन वेगवेगळे सोंग घेऊन स्नेहपुर्वक खेळ मागायला जातात.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.