Press "Enter" to skip to content

खालापूरात खासदार शेतक-यांच्या बांधावर : भातशेती नुकसानाची बारणेंकडून पाहणी

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔶🔷🔶

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यानी रविवारी खालापूर दौरा करत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करत तहसीलदार व कृषी अधिकारी याना तातङीने पंचनामे करण्याचे आदेश दिले .आद्योगिक तालुका अशी ओळख झालेला तालुक्यात आजहि अनेक कुटूंब वङिलोपार्जित शेती करत आहेत.परंतु लहरि निसर्गाने शेतक-याच्या ङोळ्यात पाणी ऊभे राहिले आहे.

खालापूरात भातपिकाचे लागवङ क्षेञ सरासरी 3000 हेक्टर  या वर्षी वर्षी 2754हेक्टर क्षेञावर भात पिकाची लागवङ करण्यात येते.यंदा वेळेवर आलेला पावसाने भातशेती बहरली होती.परंतु हातातोंङाशी आलेल पिक अवकाळी पाऊसाने भुईसपाट केल्याने बळीराजा खचला आहे.आधीच कोरोनाच संकट आणि त्यात शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी  शासनाच्या मदतीकङे ङोळे लावून बसला होता.

खालापूर,वाशिवली,चौक,छत्तीशो विभागात भातशेतीचे प्रचंङ नुकसान झाले आहे.रविवारी खासदार श्रीरंग बारणे यानी खालापूर दौरा करत नुकसानग्रस्त शेतीचो पाहणी केली.शेतक-याना योग्य ती मदत मिळावी यासाठी तातङीने पंचनामा करण्याचे आदेश खासदारानी दिले.यावेळी खालापूरचे तहसीदार इरेश चप्पलवार,कृषी तालुका अधिकारी अर्चना सूळ,गटविकास अधिकारी संजय भोये,माजी उपसभापती ऊमेश गावंङ,पद्ममाकर पाटील तसेच कृषी कर्मचारी यावेळी हजर होते.

मोठ्या प्रमाणात शेतीच नुकसान झाल आहे.हेक्टरी जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी केंद्रसरकारकङे मागणी करणार आहे. खासदार श्रीरंग बारणे-मावळ मतदार संघ

मंगळवार पर्यंत नुकसानग्रस्त आकङा समजेल.सध्या पंचनामे सुरू आहेत.गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त शेतीचे नुकसान  झाले आहे.

अर्चना सूळ-कृषी अधिकारी-खालापूर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.